श्री शिवाजीच्या राजंदा क.महाविद्यालयात पंजाबराव देशमुख जयंत्युत्सवाचे आयोजन
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
22 Dec 2022, 4:49 PM
अकोला - ज्ञानाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचविणारे आधुनिक भगीरथ शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२४ वा जयंत्युत्सव व स्नेहमिलन मेळाव्याचे उद्घाटन दिनांक २३ डिसेंबर रोजी तीन वाजता आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी आवश्यक उपस्थित रहावे असे आवाहन विद्यालयातर्फे करण्यात आले आहे. जयंत्युत्सव उद्घाटन समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख हे राहणार आहेत. उद्घाटक श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, तर प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष गजानन पुंडकर प्रमुख अतिथी माजी शिक्षक आमदार अमरावती वसंतराव खोटरे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला शिरीष धोत्रे, प्रसिद्ध उद्योजक अकोला प्रशांत देशमुख, हे राहणार आहेत.
यामध्ये ध्वजारोहण जयंत्युत्सव उद्घाटन समारंभ विज्ञान, गणित, चित्रकला व रांगोळी प्रदर्शनी तथा दीपोत्सव रोषणाई विविध खेळ, क्रीडा स्पर्धा, भावगीत वक्तृत्व निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा शिक्षण परिसंवाद आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम व महिला मेळावा असे आयोजन राहणार आहे.डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांना आदरांजली प्रभात फेरी व शोभायात्रा बक्षीस वितरण व त्यानंतर समारोपीय कार्यक्रम उपशिक्षणाधिकारी माध्यमिक शाळा तपासणी अधिकारी श्री शिवाजी शिक्षण संस्था प्रकाश अंधारे यांच्या उपस्थित होणार आहे. तरी जयंत्युत्सवाच्या या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री शिवाजी महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राजंदा प्राचार्य मनोज देशमुख, शिक्षक प्रतिनिधी सुनील बैस, हेमंत पार्थिकर,कु. वंदना भटकर, विजय ढुके, विद्यार्थी प्रतिनिधी प्रतीक अरखराव, गायत्री पोधाडे, तथा सर्व शिक्षक कर्मचारी श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राजंदा यांनी केले आहे
Post Views: 235