जि प शाळा चिंचोली गणू येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  05 Sep 2022, 8:17 PM
   

*अकोला* ....जि प शाळा चिंचोली गणू येथील प्रतिष्ठित नागरिक तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री शामरावजी गोतमारे व सौभाग्यवती नीलिमा गोतमारे सहाय्यक शिक्षिका तथा  सरपंच व उपसरपंच यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ विमल शिवचरण डोंगरे यांचा सत्कार केला. सौ नीलिमा गोतमारे यांनी शाल व श्रीफळ आणि भेटवस्तू देऊनत्यांचा सन्मान केला.तसेच शामरावजी गोतमारे व सरपंच उपसरपंच यांनी सर्व शिक्षकांचा भेट वस्तू देऊन सत्कार केला‌.   
         याप्रसंगी शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सौ गोतमारे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करून मुलांना खाऊचे वाटप केले. शिक्षक दिनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिक्षक बनून वर्गाची जबाबदारी देण्यात आली. मुख्याध्यापक म्हणून वर्ग सातवीचा विद्यार्थी यश सोनवणे याने मुख्याध्यापक पदाची जबाबदारी पार पाडली. त्यावेळी त्यांनी आपला भाषणांमधून शिक्षकांचा शिक्षणाचा अनुभव बघता खरोखरच आज 30 ते 35 वर्षापासून आपण शिक्षक शिकवता हे कमालीचेच आहे. कारण आम्ही एका दिवसामध्येच खूप हैराण झालेला आहो अशी असे सूर मनोगतातून व्यक्त झाले.मुलं सांभाळताना या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री बाहे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री रेवसकर सर यांनी केले तसेच आजच्या पाहुण्यांचे स्वागत व गावचे सरपंच उपसरपंच आणि प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित असताना त्यांचे स्वागत करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. श्री रेवस्कर, भटकर  बाहे, सौ भटकर व वाडकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली.

    Post Views:  348


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व