जव्हार पोलिसांनी जादूटोणा करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस बेड्या ठोकून केली यशस्वी कामगिरी


 संजय देशमुख  2023-01-17
   

पालघर : जव्हार पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात पैशाचा पाऊस पाडणारे लोक येणार असलेबाबतातची माहिती पोलीस निरीक्षक संजयकुमार ब्राम्हणे, प्रभारी अधिकारी मोखाडा पोलीस ठाणे, यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती.त्यानुसार दिनांक 12जानेवारी 23 रोजी रात्री 2.00 वाजताच्या सुमारास खबाळा दूरक्षेत्र हद्दीत सापळा लावण्यात आला. नमुद वेळी एक इनोव्हा कार व एक हीरो होंडा कंपनीची मोटार सायकल थांबवुन तपासणी केली असता त्यामध्ये 1) वय 46 वर्ष रा.वजेश्वरी गणेशपुरी, ता. भिवंडी 2) वय 27 वर्ष रा. पो साखरे ता. विक्रमगड 3) वय 55 वर्ष रा.आलोंडे, ता. विक्रमगड असे तीन संशयीत इसम मिळून आले. नमूद इसमाकडे कसून चौकशी केली असता फिर्यादी नामे कमलेश मंगळीया जोगारी वय 39 वर्ष रा. उपलवाड, जि- वलसाड ( गुजरात ) यांना आरोपीने 1,50,000/- रूपये आणून दे. मला सिद्धि प्राप्त आहे मी त्या सिद्धिच्या जोरावर तुला 5,00,000/- रूपये करुन देईल असे आमिष दाखवल्याचे निष्पन्न झाले त्यावरुन जव्हार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याअनुषंगाने 2000/- रूपये दराच्या खोट्या नोटा व आतमध्ये कोऱ्या 2000/- रूपये मापाच्या कागदाचे 27 बंडल, 2000/- रु नोटाचे मापाचे कोऱ्या कागदाचे 12 बंडल, 500/- रूपये दराच्या 75 खोट्या नोटा, 2.50/6 इंचाचे आलात आकाराचे नोटाचे मापाचे दोन काचेचे तुकडे, विविध प्रकारचे पूजेचे सामान व लोखंडी त्रिशूळ मिळून आले, तसेच टोयोटो कंपनीची इनोव्हा कार सिल्वर रंगाची तिचा (गाडी क्र. MH06AN 0606) व हिरो कंपनीची पैशन प्रो काळ्या रंगाची मोटार सायक़ल ( गाडी क्र. MH04 KS1964) असा एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. असुन नमूद गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक संजयकुमार ब्राम्हणे प्रभारी अधिकारी मोखाडा पोलीस ठाणे अतिरिक्त कार्यभार जव्हार पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली संजीव पिंपळे, उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग यांच्या सुचनाप्रमाणे पोलीस निरिक्षक संजयकुमार ब्राम्हणे, प्रभारी अधिकारी मोखाडा पोलीस ठाणे अतिरिक्त कार्यभार जव्हार पोलीस ठाणे, पोउपनि - जितेंद्र अहिरराव, संजय भुसाळ, केशव खादे, सफौ - भोये, पोहवा - सूर्यवंशी, पोना - भोये, भोगाडे, पोशि - मोहंडकर, लोंढे सर्व नेमणुक जव्हार व मोखाडा पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

    Post Views:  227


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व