गत तीन दिवसापासून स्थानिक डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात सुरू असलेल्या विश्वास करंडक बाल नाटय महोत्सवाचा निकाल जाहीर झाला आहे. यात अकोला येथील खंडेलवाल इंग्लिश स्कुलने सादर केलेल्या आणि सदाफुली रंगीत झाली या बाल नाटयाने प्रथम क्रमांक मिळवून विश्वास करंडक जिंकला आहे. राजेश्वर कॉन्व्हेंट अकोलाने सादर केलेल्या एक नवाब की मौत या नाटकाने द्वितीय तर आर. डी. जी. पब्लिक स्कुल अकोलाने सादर केलेल्या रूक्माई नाटकास तृतीय क्रमांकाचे पारितोषीक मिळाले आहे. उत्तेजणार्थ नाटकासाठी ठेवण्यात आलेले प्रथम क्रमांकाचे पारितोषीक स्कुल ऑफ स्कॉलर्स बिर्ला कॉलनी अकोला यांनी सादर केलेल्या संकल्प नाटकास तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषीक प्रभात किड्स स्कुल अकोलाच्या चले उज्वल भविष्य की ओर या नाटकास मिळाले आहे.
सदर महोत्सवात एकूण २७ नाटके सादर करण्यात आलीत. यातील उत्कृष्ट नाटके व कलावंत यांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज सायंकाळी भरगच्च उपस्थितीत संपन्न झाला. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधीकारी डॉ. सुचेता पाटेकर, जागतिक किर्तीचे प्रख्यात क्रॉप आर्टिस्ट राजेंद्र गोळे, स्पर्धेचे परिक्षक धनंजय सरदेशपांडे, यतीन माझीरे, गिरीश फडके यांचे सह महोत्सवाचे प्रमुख प्रा. मधु जाधव, निमंत्रक प्रशांत गावंडे व नाटय लेखक विष्णु निंबाळकर उपस्थित होते.
प्रारंभी रंग देवता नटराजनच्या प्रतिमेचे पुजन केल्यानंतर निमंत्रक प्रशांत गावंडे यांनी सर्व अतिथींचे स्वागत करून प्रास्ताविक सादर केले. शिक्षणाधिकारी पाटेकर, राजेंद्र गोळे, प्रा. मधु जाधव व विष्णु निंबाळकर तसेच परिक्षक यतीन माझीरे व धनंजय सरदेशपांडे यांनीही या प्रसंगी उपस्थित बाल कलावंतांना मार्गदर्शन केले. उपरोक्त सर्व अतिथींसह स्पर्धेचे प्रसिध्दीप्रमुख प्रदीप खाडे, जेष्ठ नाटय कलावंत अरूण घाटोळ, माजी नगरसेविका पुष्पाताई गुलवाडे व नाटय परिषदेचे सदस्य अशोक ढेरे यांच्याही हस्ते विजेत्या बालकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
उत्कृष्ट अभिनयाचे मुलांमधील प्रथम परितोषीक एक नवाब की मौत मधील श्रेयस इंगळे, द्वितीय पारितोषीक व्हॉट्स अॅप चा तमाशा मधील निखील खंदारे यास तर तृतीय पारितोषीक लहानपण देगा देवा या नाटकातील अथर्व महल्ले यास देण्यात आले. मुलींमधुन उत्कृष्ट अभिनयाचे प्रथम पारितोषीक सदाफुलीमधील अदिती वानखडे हिला, द्वितीय पारितोषीक रुक्माई मधील उत्तरा पुरकर तर तृतीय पारितोषीक संकल्प मधील समृध्दी शिरसाट हिला देण्यात आले. उत्कृष्ठ दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषीक सदाफुली नाटकाच्या वृषाली जोशी, द्वितीय पारितोषीक एक नवाब की मौत करीता डॉ. प्रदिप अवचार तर तृतीय पारितोषीक रुक्माई नाटकाकरीता संघमित्रा चंदनखेडे व नागसेन इंगळे यांना देण्यात आले. उत्कृष्ठ प्रकाश योजनेकरीता प्रथम पारितोषीक लहानपण देगा देवा नाटकासाठी अजय बहाल यांना, द्वितीय रुक्माई करीता ओम पाटील यांना तर तृतीय पारितोषीक सदाफुली करीता कडु अठायकर यांना देण्यात आले. उत्कृष्ट वेशभुषेकरीता प्रथम पारितोषीक साधाना बोबडे यांना, द्वितीय स्मिता पारसकर व मिनाक्षी मोहोड यांना तर तृतीय पारितोषीक रश्मी नवघरे व दिपीका राजूरकर यांना देण्यात आले. उत्कृष्ट संगिताचे प्रथम पारितोषीक पाखरांची शाळा करीता अनुल देशमुख, द्वितीय सदाफुली करीता अभिषेक अडसुले व तृतीय पारितोषीक चले उज्वल भविष्य की ओर या नाटकाकरीता नंदकिशोर डंबाळे यांना देण्यात आले. उत्कृष्ठ नेपथ्याकरीता प्रथम पारितोषीक गांधी व्हायचं आम्हाला या नाटकाच्या राम कडर व अनुज खकडे यांना, द्वितीय रूक्माई करीता सौरभ महल्ले यांना तर तृतीय पारितोषीक चिठ्ठी नाटकाकरीता वैशाली देशमुख यांना प्र करण्यात आले. नविन संहीतेकरीता उत्कृष्ठ लेखकाचा पुरस्कार स्कुल ऑफ स्कॉलर बिर्ला कॉलनीच्या संकल्प नाटकास देण्यात आला. विशेष समिक्षकाचा पुरस्कार पुंडलिक बाबा विद्यालय चांदुरच्या महामारी एक सामाजिक समस्या या नाटकास देण्यात आला. याचे समिक्षक म्हणून विष्णू निंबाळकर यांनी काम पाहिले. याशिवाय २७ नाटकातील २७ बाल कलावंतांना उत्तेजनार्थ पारितोषीक देण्यात आले त्यात अंकिता वानखडे, आदिनाथ पांडे, शामल धोटे, रेणुका म्हैसने, सई खाकरे, नयन जाधव, कृष्णा शर्मा, चंच सपकाळ, अक्षरा सौंदळे, अदिती इंगळे, अथर्व अग्रवाल, रूद्र जानोरकर, साक्षी लहाने, कृष्णा तराळे, अथर्व कोरडे, तृप्ती घावट, हर्षदा काशिद, पार्थ बेहरे, मनसब खान मुहाजिद खान, अश्विनी पागृत, ईश्वरी काळमेघ, सानिका गावंडे, परिधी बावनेर, सोनम पट्टे, आयुष गावंडे व तन्वी देशमुख या बाल कलावंताचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी जे. आर. डी. टाटा स्कुलच्या विदयार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात विश्वास करंडक नाटय गृहात आणला.
Post Views: 174
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay