गॅस सिलेंडरचा काळा बाजार, 19 सिलिंडर जप्त
विशेष पथकाची कारवाई; 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
अकोला : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा काळाबाजार करून खाजगी वाहन ऑटो रिक्षा मध्ये भरण्यासाठी साठवणूक करणाऱ्या आरोपीला जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अटक केली. या कारवाईत 19 घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जुनेशहर परिसरातील हमजा प्लॉट कडबा कटरजवळ एका गोडावूनमध्ये विनापरवाना घरगुती गैस सिलेंडर साठवून ठेवण्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक विलास पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी रुस्तम भीमराव शीतले वय 35 वर्ष रा. जेतवन नगर खदान याच्या गोडाऊन वर छापेमारी केली असता त्यामध्ये अवैद्य स्प्लेंडर आढळून आले. या घरगुती गॅस सिलेंडरचा वापर खाजगी वाहतूक ऑटोरिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी केला जात होता. या कारवाईत पप्पाने 19 भरलेले गॅस सिलेंडर दोन केस भरण्याच्या मशीन एक गॅस वजन काटा या एकूण 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरोधात जुने शहर पोलीस स्टेशनला भारतीय जीवनावश्यक वस्तु अधिनियम कलम 3, 7 अन्वये गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका रावते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या पथकातील विनोद तुरकर, एजाज अहमद, महेंद्र मलीये आदींनी केली.
Post Views: 274