चार हजार दोनशे उमेदवार;तीन लाखांवर मतदार!


ग्रामपंचायत निवडणूक;गावागावात प्रचाराची रणधुमाळी जोरात
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  14 Dec 2022, 5:07 PM
   

अकोला-जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदाच्या २५८ पदांसाठी होणाऱ्या  सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.जिल्ह्यातील ८३३ मतदान केंद्रावर ३ लाख १० हजार २४९ मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार असून ४ हजार २३५ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर रोजी जाहीर केला.त्या अनुषंगाने जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, बाळापुर, मुर्तीजापुर, बार्शीटाकळी, अकोला व पातुर या सातही तालुक्यातील २६६ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान तर २० डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.यंदा थेट सरपंच पदाची निवडणूक होत असल्याने गावागावात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. आपल्या गावाचा विकास कसा होईल हे या निवडणुकीच्या निमित्ताने सरपंच पदाचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवाराकडून मतदारांना पटवून सांगण्यात येत आहे. सरपंच पदासाठी प्रत्येक गावात पाच पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असल्याचे सध्यातरी चित्र आहे.दरम्यान चार सरपंचपदांची निवडणूक अविरोध झाली असून, चार सरपंचपदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याने २५८ सरपंच पदांसाठी ९३६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.५५४ सदस्यांची निवडणूक अविरोध झाली असून ६६ सदस्य पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याने १ हजार ३५४ सदस्य पदांसाठी ३ हजार २९९ उमेदवार निवडणूक लढवत असल्याचे चित्र आहे.
असे आहेत मतदार

तालुका    ग्रा.पं    पुरुष       स्त्री         एकूण
तेल्हारा   २३      १६३५८  १४७७५   ३११३३
अकोट    ३७     २७९६५   २४८९८   ५२८६३
मूर्तिजापूर ५१   ३०८२२   २७८६२   ५८६८४
अकोला   ५४   २९६९७     २७२४२   ५६९४२
बाळापूर   २६  १४२०४     १२९८१    २७१८५
बा.टाकळी ४७  २५०८७  २४५४१     ४९६२८
पातूर        २८  १७७६२   १६०५२     ३३८१४
एकूण   २६६  १६१८९५  १४८३५१  ३१०२४९

जिल्ह्यात ८३३ मतदान केंद्र

२६६ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत ८१७ प्रभाग असून ८३३ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.केंद्रामध्ये तेल्हारा-७३, अकोट-१२८, मूर्तिजापूर-१६२, अकोला-१६६, बाळापूर-७८, बार्शीटाकळी- १४१, पातूर- ८५ असे एकूण ८३३ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.

    Post Views:  132


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व