लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून नारीशक्ती जनजागृती अभियान
धामणगाव पत्रकारांचा सामाजिक जागृती उपक्रम
धामणगाव-- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना व जिजाऊ ब्रिगेड .यांच्या संयुक.त विद्यमाने नवरात्री उत्सवानिमित्त नारीशक्ती जनजागृती अभियान राबविण्यात आले.
श्री कान्होजी बाबा कनिष्ठ महाविद्यालय व साईबाबा महाविद्यालय अंजनसिंगी येथे ११ आक्टोंबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यित आले होते.यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचार कमी करण्यासाठी त्यांनी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याची सविस्तर माहिती या कार्यक्रमांमधून सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली. अतिशय सुंदर पद्धतीचा कार्यक्रम या नवरात्री उत्सवामध्ये लोकस्वातंत्र पत्रकार संघाकडून राबविण्यात आला :यावेळी पत्रकार महासंघाचे सदस्य व आगामी पदाधिकारी पत्रकार महिंद्र काळे ,जिजाऊ ब्रिगेड ची जिल्हा कार्यकारिणी व शिक्षक कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Post Views: 71