सन्मा.सौ. अनिता देशमुख सरदार यांच्या वाढदिवसानिमित्त सहकाऱ्यांनी दिल्या अनंत शुभेच्छा...


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  13 Sep 2022, 8:14 AM
   

कल्याण : अंधश्रद्धा निर्मूलन समिती कल्याण शाखेच्या महिला कार्याध्यक्षा तसेच समाज प्रबोधन आणि परीवर्तन चळवळीच्या उत्कृष्ट वक्ता, साहित्यिक सन्माननीय सौ.अनिताताई देशमुख  यांना १३ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सहकाऱ्यांनी व कार्यकारी सदस्यांनी शुभेच्छा दिल्या.
             सध्या त्या कल्याण येथे वास्तव्याला असून त्यांचे गाव नांदुरा, जिल्हा बुलढाणा येथे नातलग व आत्पेष्ट स्थित आहेत. त्यांचे शिक्षण कला शाखेतून पदव्युत्तर बी.ए. फॅशन डिझायनिंग आणि डिप्लोमा असे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती कल्याण शाखा, ठाणे च्या कार्यकर्ता असून महिलांच्या समस्या व सामाजिक स्थितीवर त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. समाज परीवर्तन आणि पुरोगामी चळवळीत न्यायासाठी कायद्याने लढणे, समाज प्रबोधन करणे, आपले योग्य मत मांडून इतरांची मते समजून त्यावर अंमलबजावणी करणे यांसारख्या कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. त्या एक उत्तम गृहिणी असून भरतकाम, विणकाम, शिवणकाम, झाडे लावणे, चित्रकला, हस्तकला, रांगोळी काढणे, गायन, वाचन, लेखन इत्यादी छंद जोपासत असतात. शिवणकाम आणि विणकामाचे शिकवणी देखील त्यांनी घेतली आहे. अंधश्रद्धेवर राज्यस्तरीय निबंधलेखन, सामाजिक लेख व काव्यलेखन स्पर्धेत त्यांनी बक्षिसे मिळविली आहेत. याशिवाय सामाजिक उपक्रम  राबवणे तसेच फटाकेमुक्त दिवाळी विषयावर अनेक शाळा आणि कॉलेजमध्ये प्रबोधनपर माहिती देणे सर्प आणि त्याबद्दल माहिती वटपौर्णिमा यावर महिलांसाठी विशेष उपक्रम व प्रबोधन आणि निसर्गाचे फायदे ,वृक्ष संवर्धन यावर माहिती देणे. नुकताच नाशिक येथे काव्यरत्न पुरस्कार अहिरे एकेडमी तर्फे त्यांना प्रदान करण्यात आला. वामनदादा कर्डक जन्मशताब्दी निमित्ताने उल्हासनगर येथे साहित्य संमेलनात सूत्रसंचालन आणि राष्ट्रीय महाराष्ट्र शासन पर्यटन महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सूत्रसंचालन अशा विविध कार्यक्रमात त्यांचे मोलाचे योगदान आहे. अनेक वृत्तपत्रे व मासिकांतून  वेगवेगळ्या विषयांवर त्यांचे सामाजिक लेख, कविता, गझल नियमित प्रकाशित होत असतात. त्या भावमेघ साहित्य विचार मंचच्या प्रमुख अध्यक्षा व संस्थापिका असून समूहाच्या वतीने शैक्षणिक आणि साहित्यिक उपक्रम त्या घेत असतात. अशा बहुआयामी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या अनिताताईंना त्यांच्या जन्मदिनी आभाळभर शुभेच्छा.

    Post Views:  161


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख