अकोला : श्रीसंत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोट यांच्यावतीने श्रीक्षेत्र श्रद्धा सागर ते महाराष्ट्राचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पंढरपूर अशी वारी ( दिडी )काढण्यात आली होती. या वारीमध्ये वारकरी म्हणून सहभागी झालेले गजानन ओंकार हरणे खडकी अकोलाचे ज्येष्ठ समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जनआंदोलन यांनी वारीमध्ये सहभाग घेऊन १महिना पैयदल वारी पूर्ण केली. या मधे ६५० किलोमीटर अंतर पार केले. तसेच या वारीदरम्यान चे वृत्त संकलनाचे कार्य निस्वार्थपणे पूर्ण करून व्हाट्सअप, फेसबुक, ट्यूटर, अनेक वृत्तपत्राच्या माध्यमातून वारीचा प्रसार व प्रचार सेवाभाव वृत्तीने करण्याचे महान कार्य त्यांनी करून वारकऱ्यांना व संस्थेला उत्तम प्रकारे सहकार्य केल्याबद्दल पंढरपूर येथील श्रीसंत वासुदेव महाराज मठ, व अकोट येथील श्रीश्रद्धा सागर या दोन्ही ठिकाणी झालेल्या भावपूर्ण समारोपीय कार्यक्रमात श्रीसंत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोट द्वारे त्यांचा साल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये व संस्थेचे पदाधिकारी , अध्यक्ष हभप वासुदेवराव महल्ले पाटील, गजाननराव दुधाळ , अनिलराव कोरपे, हभप अंबादास मानकर, मोहनराव जायले पाटील, अविनास गावंडे, सचिव रवींद्र वानखडे , महादेवराव ठाकरे, सुनंदाताई आमले, नंदकिशोर हिंगणकर, केशवप्रसाद राठी,हभप सागर महाराज परिहार, हभप विष्णु महाराज गावडे ,ह भ प मोहकार महाराज , मुख्याध्यापक जयदीप सोनकास्कर , यांच्या उपस्थितीमध्ये व शुभहस्ते गौरव ,सत्कार करण्यात आला. तसेच या पालखीला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिल्याबद्दल सर्व वृत्तपत्राचे , पेपरचे संपादक/ प्रतिनिधीचे मना पासुन अभार समाजसेवक श्री गजानन हरणे यांनी मानले व धन्यवाद दिले. या दोन्ही कार्यक्रमाला पैदल वारी मधील सर्व सहभागी वारकरी महिला युवक युवती व संस्थेचे सर्व पदाधिकारी सेवाधारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा शेवट महाप्रसादाने झाला. कार्यक्रमाचे संचालन हभप अंबादास महाराज मानकर यांनी तर आभार प्रदर्शन अविनाश गावंडे यांनी केले.
Post Views: 155
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay