प्रभातच्या १२५ खेळाडूंची विभागस्तरीय स्पर्धांसाठी निवड
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
10 Dec 2022, 2:33 PM
अकोला : कोविड-१९ नंतर जिल्हास्तरीय शालेय विविध क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या असून या स्पर्धांमध्ये प्रभात किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले असून प्रभातच्या तब्बल १२५ खेळाडूंची विभागस्तरीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे.
प्रभातमध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययनासह सांस्कृतिक तथा क्रीडा गुणांच्या विकासावर विशेष लक्ष दिल्या जात असून सीबीएसई तथा राज्य बोर्डांतर्गत घेतेल्या जाणार्या १९ खेळांचे प्रशिक्षण देण्यात येते. कोविड-१९च्या प्रादुर्भावात केवळ ऑॅनलाईन शिक्षण शक्य असल्यामुळे कुठल्याही शालेय क्रीडा स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. मात्र चालु शैक्षणिक सत्रामध्ये सुरुवातीपासूनच प्रभातमध्ये विद्यार्थ्यांच्या क्रीडा प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात आला. प्रभातच्या क्रीडा विभागातील २५ क्रीडा शिक्षक तथा प्रशिक्षकांनी विविध क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांचा सराव करुन घेतला.
जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये प्रभात किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले असून विविध १७ खेळांच्या १२५ खेळाडूंची निवड विभाग स्तरीय स्पर्धांसाठी झाली आहे; यामध्ये बास्केटबॉलचे २४ खेळाडू, ज्युदो १७ खेळाडू, योगा ९, टेबलटेनिस ८, रायफलशूटींग ५, लॉनटेनिस २, स्केटींग ४, बॉक्सिंग ५, बॅडमिंटन ५, कॅरम १०, व्हॉलीबॉल २, क्रिकेट १६, बुद्धीबळ ८, कराटे २, तायक्वाँदो १० आणि कुस्तीच्या ३ खेळाडूंचा समावेश आहे.
क्रीडा विभागाचे क्रीडा शिक्षक तथा प्रशिक्षक संतोष लोमटे, आशिष बेलोकार, राहुल वानखडे, स्वप्निल मांदाळे, विशाल कोथळकर, गजानन चव्हाण, किरण बुंदेले, मयुरी इंगळे, रिया ताराम, संजीवनी बोंद्रे, जया मुळे, संतोष गायगोये, कोमल यादव, निकुंज खोवल, आशिष शर्मा, तन्वीर खान, वैभव देहलीवाले, अनिल कांबळे, राहुल गजभिये, जितेंद्र अग्रवाल, अभिजीत कर्णे,अभिजीत काकड, अंझार कुरेशी, शेख शाहरुख आणि सौम्य लोडया यांनी खेळाडूंना मार्गदर्शन दिले. प्रभातचे संचालक डॉ. गजनान नारे, संचालिका सौ. वंदना नारे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, शाळा समन्वयक मो. असिफ तथा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी विजयी विद्यार्थ्यांना आगामी विभागस्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Post Views: 135