विद्यापीठ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे टाटा बिल्डिंग इंडिया आयोजित निबंध स्पर्धेत यश


 विश्वप्रभात  27 Aug 2025, 9:10 PM
   

पुणे - टाटा बिल्डिंग इंडिया  व महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल प्रशालेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शालेय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना ऐनवेळी आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी माझी भूमिका हा निबंधाचा विषय देण्यात आलेला होता. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे विचार व चिंतन करून ऐनवेळी दिलेल्या विषयावर निबंध लिहिला. या निबंध स्पर्धेत प्रशालेतील इयत्ता आठवी ते दहावीचे उस्फूर्तपणे 180 विद्यार्थी सहभागी झाले होते.
लहान गट
१) प्रथम क्रमांक-- दमयंती गडदरे
 २) द्वितीय क्रमांक -- पूर्वी खंडागळे 
३) तृतीय क्रमांक-- कोमल डोलारे
मोठा गट 
१) प्रथम क्रमांक --- गायत्री कुंभकर्ण
२) द्वितीय क्रमांक--- साहिल लोहार 
३) तृतीय क्रमांक--- वेदांत झोरे
प्रश्नमंजुषा.
अपेक्षा मगर 
सोनाली घोडके 
शुभम पंडित 
कल्याणी दाभाडे 
विद्या शेवाळे
निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक विष्णू मोरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व गौरव पदक देऊन गौरविण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक प्रशालेच्या वतीने करण्यात आले. स्पर्धेचे नियोजन टाटा बिल्डिंग इंडियाचे प्रतिनिधी सागर शिंदे,  प्रशालेच्या शिक्षिका वैशाली सैंधाणे व पल्लवी अभंग यांनी केले होते.

    Post Views:  125


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व