अन्य व औषध प्रशासनाच्या दुर्लक्षतेने ग्राहकांचे आरोग्य धोक्यात


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  01 Apr 2023, 11:04 AM
   

पालघर - (संतोष घरत) - बोईसर परिसरातील  एका दुकानातील मिठाईवर चक्क उंदीर(मूषक) फिरत असल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यंवार व्हायरल होताच मोठी खळबळ माजली असून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या मिठाईच्या दुकानदारावर कठोर कारवाई करून दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणी होत आहे.
 रामनवमीच्या पहिल्या दिवशी २९ मार्च रोजी बोईसर जवळील टाटा हाऊसिंग सोसायटीच्या बाजूस द्वारका स्वीट मार्ट बेटेगाव येथील मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ विक्री दुकानाच्या काचेच्या पेटीमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईमध्ये चक्क एक उंदीर (मूषक)उड्या मारत फिरत असल्याचे एका ग्राहकाच्या निदर्शनास आले. त्याने याचा व्हिडीओ काढून समाज माध्यमावर टाकताच बोईसर परिसरात खळबळ उडाली आहे.  बेटेगाव येथील द्वारका स्वीट मार्ट या भेसळयुक्त दुकानात, मुदत संपलेली आणि पूर्ण खराब झालेली मिठाई 
खुलेआम विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी ग्राहक करत आहेत. 
या दुकानाप्रमाणेच बोईसर परिसरातील इतर अनेक मिठाईची दुकाने, हॉटेल्स, धाबे, चायनीज सेंटर्स या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व नियम यांचा भंग करण्यात येतो. यातील खाद्यपदार्थांची अनेक दुकाने ही तर विनापरवानगी सुरू आहेत.    
दुकानासमोर असलेली अस्वच्छता, घाण,खराब मिठाई व खाद्यपदार्थ यांची भेसळयुक्त आणि कमी प्रतीच्या मालाचा वापर, मुदत संपलेले व बुरशी लागलेले बेकरी पदार्थ, कृत्रिम रंग, रसायने यांचा प्रमाणापेक्षा अधिक वापर सर्रासपणे करून खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. निकृष्ट खाद्यपदार्थ सेवन केल्यामुळे नागरिकांना विविध प्रकारच्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. या सर्व गैरप्रकारांकडे अन्न व औषध प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष होताना दिसत आहे यामध्ये तीळ मात्र शंका नाही.

    Post Views:  204


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व