आर्वीत स्व. लता मंगेशकरांचे साकारले मंदिर
मधुर आवाजाच्या समुद्रात बुडालेल्या एकलव्य राजु देशमुख यांनी केली प्रतीज्ञा पूर्ण
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
2022-12-05
आर्वी ः स्वर सम्राज्ञी, गाण कोकीळा स्व. लता मंगेशकर यांच्या संगीतमय आवाजाने प्रभावीत झाली नाही अशी एकही व्यक्ती भारतातच नव्हे तर जगात सुद्धा सापडने दुरापास्त आहे. त्यांच्या मधुर सुरमयी आवाजाच्या समुद्रात आकंठ बुडालेल्या अशाच संगीत प्रेमी राजीव देशमुख यांनी त्यांना आपल्या हृदयातच नव्हे तर आपल्या राहत्या घरात मंदिर साकारून त्यांच्या सुंदर अशा मृतीची स्थापना करुन दैवत्वाचा दर्जा बहाल करुन आपली प्रतिज्ञा पूर्ण केली आहे. लतादिदीच्या मृत्यू नंतर साकारलेले हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असावे, अशी शक्यता वर्तवील्या जात आहे.
कलेचं जग एक असं अनोख जग आहे. ज्याचा धांगपत्ता लावणे कठीण आहे. अशा प्रशस्त आणि संम्मोहित करणार्या कला जगतामध्ये अनेक रहस्य दडलेली असतात. कलाकार स्थीर चित्तवृत्तीने आणि कठोर साधनेने कला आणि त्यातील खाचाखळगे पार करून यशस्वी ध्येयसिद्धीकडे वाटचाल करीत असतात. लता दिदी सुद्धा यातील एक आहे. त्यांना प्राप्त झालेल्या ईश्वरी आवाजाच्या दिव्यतेने त्यांनी जगातील संगीत प्रेमींना भुरळ पाडली आहे. राजीव देशमुख हे सुद्धा यातील एक आहेत.


राजीव देशमुख यांना बालपणापासूनच लता दिदीच्या आवाजाने भुरळ पाडली होती. लता दिदीच्या आवाजातील गाण सुरू झालं की ते एकाग्र होवून त्याचं गाणं एैकत होते. यातूनच त्यांची संगीत क्षेत्रात रुची वाढली. लता दिदीच्या आवाजातील गाणं गुणगूणणे हा त्यांचा नित्याचा क्रम ठरला होता. त्यांच्या दिवसाची सुरूवात लता दिदीचं गाणं एैकण्यापासूनच व्हायची. अशातच लता दिदीला भेटण्याची त्यांना ओढ लागली. पहिला प्रयत्न अयशस्वी झाला मात्र दुसरा प्रयत्न सफल झाला. या भेटीचा आनंद काही औरच होता. जणु काही संगीताची देवताच आपल पुढ्यात उभी आहे आणि त्यांचेच आपण दर्शन करतो आहो, अशी अनुभूती होत होती. व्यवसायाने ते कंत्राटदार जरी असले तरी त्यांची रुची संगीत क्षेत्रात जास्त होती. ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून असो, अथवा घरी तयार केलेल्या संगीत रुम मधून ते लता दिदीच्या आवाजातील गाणे ऐकण्याचा व गुणगूणाच्या आपला छंद जोपासत होते. एवढच नाही तर त्यांनी लग्नाच्या पत्रीकेवर देवीदेवतांच्या जागेवर लता दिदीचा फोटो टाकून आपलं प्रेम प्रगट केलं. लग्न झाल्यानंतर त्यांना पत्नी शुभांगी हिची सुद्धा साथ मिळाली. ती तर लता दिदीच्या प्रेमात त्यांच्या पुढे निघाली. अहोरात्र परिश्रम घेवून संगीताची देवता सरस्वती यांच्या रुपातील लता दिदीचं सुंदर अस तैल चित्र निर्माण केलं आणि देवघरात स्थान दिलं. अशातच वयाच्या 80 व्या वर्षी लता दिदीचं दुःखद निधन झालं. यावेळी, जणू काही आपल्या परिवारातील व्यक्तीचं आपल्याला सोडून गेल्याची हूरहूर लागली. आणि संपूर्ण देशमुख परिवार शोक सागरात बुडाला. याच वेळी राजीव देशमुख यांनी लता दिदीचं मंदिर बांधण्याची प्रतिज्ञ केली. अखेर येथील राहत्या घरात नागपूरच्या कारागिराकडून श्वेत रंगाचं सुंदर असं मंदिर तयार केलं. जयपूर वरून लता दिदीची मुर्ती बनवून घेतली. दिदीच्या स्मृती दिनी 28 सप्टेंबरला या मंदिरात मुर्तीची प्राण प्रतिष्ठा केली. लता दिदीच्या स्मृतीमध्ये राजीव देशमुख यांनी स्वतःच एक गित तयार केले व स्व. आवाजात गायन करून लता दिदींना मानाचा मुजरा अर्पण केला.
ज्याप्रमाणे भाविक भक्त देवी देवतांच्या मंदिरात जावून दर्शन घेवून आपल्या दिवसाच्या कामाची सुरुवात करतात त्याच प्रमाणे राजीव देशमुख सुद्धा लता दिदीचं दर्शन घेतात काही वेळ शांततेत घालवतात आणि नंतरच दिवसाच्या कामाची सुरुवात करतात. लता दिदी आवाजाने प्रभावी होवून भक्त झालेल्या राजीव देशमुख यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. त्यांचा आदर्श सर्व संगीत प्रेमींनी व कला प्रेमींनी बाळगायला पाहिजे, अशा अपेक्षा व्यक्त होत आहेत.
Post Views: 151