पिंजर पोलिस स्टेशनच्या गुन्ह्यांचे अनैतिक मानवी वाहतुक कक्षाकडून तपास
अनैतिक मानवी वाहतुक कक्षाकडून एकून ११६ गुन्हे उघडकीस
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
20 Feb 2024, 8:35 AM
अकोला -अकोला पोलिस विभागाच्या अनैतिक मानवी वाहतुक कक्षाकडून पिंजर पोलिस स्टेशनमधील दोन दाखल गुन्ह्यांचे तपास करून आरोपी व पिडीत मुलींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे पिंजर येथे दाखल या दोन गुन्ह्यांसह एकून ११६ प्रकरणांचा तपास करण्याची कामगिरी पूर्ण केली आहे.
महिला व बाल अत्त्याचारांमध्ये कलम ३६३ व ३६६ (अ) अंतर्गत ११६ प्रकरणामध्येआतापर्यंत ८३ गुन्हे आणि हरविल्याच्या ३३ गुन्ह्यांचा समावेश आहे. सध्याच्या तपासातील २ गुन्ह्यातील आरोपी व पिडीत मुलींचे शोध पुणे,नाशिक,संभाजीनगर येथे घेण्यात आले होते.परंतू हे आरोपी मुंबई येथे राहत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाल्यावरून मुंबईतील मालवणी पोलिस स्टेशनच्या निरीक्षकांशी याबाबत चर्चा करण्यात आली.सदर आरोपी पनवेल परिसरातील कामोठे येथे भाड्याच्या घरात राहत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर तेथील पोलिस स्टेशनला माहिती देऊन त्यांना तेथे जाऊन ताब्यात घेण्यात आले.एका आरोपी आणि मुलीला दिवा येथील एकविरा अपार्टमेन्टमधून ताब्यात घेण्यात आले.
अकोला पोलिस अधिक्षक बच्चन सिंह व अप्पर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे तथा शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सतिश कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय खंदाडे,पो.उपनिरीक्षक विजय खर्चे,मनोहर वानखडे,पो.हे.कॉ.सुरज मंगरूळकर,धनराज चव्हाण,म.पो.कॉ पूनम बचे,सुमन पळसकर,वाहन चालक पो.कॉ.अविन्द्र खोडे, देवानंद खरात,आशिष आमले, राहूल सानप यांनी ही कारवाई केली. ईतर गुन्ह्यांच्या तपास कामात सुध्दा अनैतिक मानवी वाहतूक कक्ष तत्परतेने सक्रीय आहे.
Post Views: 97