पोटच्या दोन चीमुकल्या मुलींना भिकुंडनदीत जिवंत फेकुन दीलेल्या दोनही मुलींचे मृतदेह पिंजर येथील बचाव पथकाने शोधून बाहेर काढलेत
पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांची जिगरबाज कामगीरी नदीत बेपत्ता असलेल्या दोन्ही बहिणींचे मृतदेह रात्रीच शोधुन बाहेर काढून दीलेत.
मनाला सुन्न करणारी घटना आहे ही .. अशा घटनांना आळा घालण्यासाठी यशस्वी समाज व्यवस्थापन तसेच यशस्वी कुटुंब व्यवस्थापन गरेजेचे आहे ही जबाबादारी समाजातील प्रत्येक नागरीकांची आहे ... दिपक सदाफळे जिवरक्षक तथा आपत्ती व्यवस्थापन निवारण विभाग.
घटनाक्रम... _चार ऑक्टोंबर रोजी दुपारी अंदाजे दोन वाजताच्या सुमारास अकोला जिल्ह्य़ातील बाळापुर येथील सहा नंबर नॅशनल हायवे वरील पुलाखाली भिकुंडनदी पात्रात बुलढाणा जिल्ह्य़ातील खामगाव तालुक्यातील कदमापुर येथील शे.हारुन शे.शब्बीर यांनी आपल्या आलीया आणी सदप या अंदाजे सात आणी नऊ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींना खोल नदीत एकाच वेळी दोन्ही मुलींना जिवंत ढकलून दिल्याची कबुली आरोपी वडीलाने पोलीसांना दिली पासुन स्थानिकांकडून शोध मोहीम चालु होती परंतु काहीच मिळुन आले नसल्याने बुलाढाणा जिल्हाधीकारी कीरण पाटील सर आणी बाळापुर उ.वि.पो.अ.विनोद ठाकरे सर बाळापुर पोलीस ठाण्याचे पो.नि.अनिल जुंमळे सर स्था.गु.शा. बुलढाण्याचे अशोक लांडे सर यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले तेव्हा क्षणाचाही विलंब न करत लगेचच दिपक सदाफळे यांनी आपले सहकारी अंकुश सदाफळे,शेखर केवट,मयुर कळसकार, विष्णु केवट,शिवम वानखडे,अश्विन केवट, विकी गाडगे,गौरव गाडगे, प्रतिक बोरसे यांचेसह शोध व बचाव साहित्य घेऊन घटनास्थळावर पोहचले लगेच आत जाऊन सिन ट्रेस केला असता जागेवर नदी पात्रात खोल पाणी आणी सेंटर ला तळात गणपती मूर्तीचे ढाचे,व दगड,लोंखंडी राॅड असल्याचे ट्रेस झाले दोन तास पथकातील पाच एक्सपर्ट स्विमर यांनी साखळी पद्धतीने अंडर वाॅटर सर्चिँग चालु केले तरी काहीच मिळुन आले नाही शेवटी रात्री नऊ वाजता घटनास्थळावरून पुढे रेस्क्युबोटीने सर्च ऑपरेशन करत असताना घटनास्थळावरून एक.मी. अंतरावर एक आणी तेथुन पुढे 100 मीटर अंतरावर दुसरा असे दोन्ही बहीणींचे मृतदेह पाच ऑक्टोंबर रोजी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास शोधण्यात आंम्हास यश आले दोन्ही मृतदेह पोलीसांच्या ताब्यात दीले तेव्हा नातेवाईकांनी पंचा समक्ष दोन्ही बहीनींचे मृतदेह ओळखले. *विशेषत घटनास्थळावर पोलीस अधीक्षक बुलढाणा विश्व पानसरे सर, डिवायएसपी विनोद ठाकरे सर, खामगाव,डिवायएसपी बाळापुर गजानन पडघन सर,स्थानिक गुन्हेशाखा बुलढाणा चे पो.नि.अशोक लांडे सर,बाळापुर पोलीस ठाण्याचे पो.नि.अणील जुमळे सर,पो.नि.ग्रामीण खामगाव चे व्यंकटेश आलेवार सर,एपिआय रवी मुंडे सर,एपिआय चेचेरे साहेब,डीएसबी चे पिआय अंबुलकर सर,पिएसआय पुसाम मॅडम,पोलीस कर्मचारी कैलास चव्हाण साहेब,बाळकृष्ण फुंडकर साहेब,संजय काकडे साहेब, पो.काॅ.राजेंद्र टेकाडे साहेब, नितेश राठोड साहेब, मुकेश इंगळे साहेब,तसेच बुलाढाणा खामगाव पोलीस आणी बाळापुर पोलीस घटनास्थळावर पुर्ण वेळ उपस्थित होते.... येथील सामाजिक कार्यकर्ते टील्लु ठाकुर तसेच नातेवाईकांसह बाळापुर येथील नागराज हजर होते.अशी माहीती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली आहे.
Post Views: 163