ऍड कोहाडे यांचा आधार फाऊंडेशनच्या वतीने सत्कार


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  30 Nov 2022, 1:11 PM
   

अकोला :  आधार फाऊंडेशनचे मार्गदर्शक ऍड. वंदन कोहाडे यांची श्री गुरुदेव सेवा मंडळ प्रचार विभाग, गुरुकुंज मोझरी च्या कार्यकारणी मध्ये सदस्य पदी निवड झाल्याबद्दल आधार फाउंडेशनच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ऍड. कोहाडे यांनी याआधी देखील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या ग्रामगीता जिवन विकास परीक्षा विभागाचे अकोला जिल्ह्याचे काम पाहिले असून हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी या परीक्षेचा लाभ दिला आहे. व संपूर्ण जिल्ह्यातून गुरुकुंज मोझरीच्या प्रचार विभागात त्यांची निवड झाल्याने सर्व गुरुदेव सेवकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. यावेळी आधार फाऊंडेशन चे अध्यक्ष माणीक शेळके, सचिव राहुल ठाकूर, गौरव पांडे, केवल ठाकूर, सुमित ठाकरे, मंगल इंगळे, सुशील ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

    Post Views:  262


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व