समाधानी रहावं... !!


 संजय देशमुख  20 Jan 2022, 1:47 PM
   

शक्तिवान म्हणे देवाला थोडी अजून शक्ती द्यावी,
पांगळा म्हणे देवाला फक्त पायात ताकत यावी....

धनवान म्हणे देवाला थोडी अजून संपत्ती द्यावी,
दीन म्हणे देवाला एकवेळ भाकरी मिळावी...

डोळस म्हणे देवाला सारं जग पहायचंय मला,
आंधळा म्हणे देवाला कधी पाहू शकेन का स्वत:ला?...

देव म्हणाला सर्वांना मी एकच करू शकतो,
एकाच्या जागी दुस-याला बसवून बघतो...

देवाचे असे उद्गार ऐकताच विकलांग आनंदीत झाले,
ज्यांना भरभरून दिलंय ते घाबरूनच गेले...

नको म्हणती देवाला दिलंस तेच भरपूर आहे देवा,
परिपूर्ण घडवलंस आम्हाला,
करू आता दीन दुबळ्यांचीच सेवा...

स्मिता दळवी
खारघर, नवी मुंबई
९८३३८६४८८४

    Post Views:  304


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व