संगीतकला मानसिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
02 Dec 2024, 11:10 AM
उरुळी कांचन: प्राचीन काळापासून संगीत कला जोपासल्या जात आहे .आदिमानव आपल्या रक्षणासाठी ढोलाचा वापर करीत असत व त्यातून आनंद मिळवत असत. भगवान शंकरांचे तांडव नृत्य हे एक संगीताचाच भाग आहे.ही उपजत कला नटेश्वर पासून सुरू झालेली आहे. संगीताला अत्यंत प्राचीन इतिहास आहे.आदिमाया शक्ती सरस्वतीचा ह्या कलेला आशीर्वाद असतो.संगीत ईश्वराची खास देणगीअसुन ती उपजत नैसर्गिक कला आहे .सुखदुःखात संगीताचे खूप महत्त्व कळते.नादयुक्त गायन, वादन, नृत्य, इत्यादीचा समावेश संगीत कलेमध्ये होतो .अन्न ,अक्षर, आरोग्य, आणि आचरण ह्या मनुष्याला मूलभूत बाबी आवश्यक असुन मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत अत्यंत उपयुक्त व महत्वाचे असते.संगीत मनुष्याला मानसिक स्वास्थ्य प्रदान करते ,असे मत ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार ह भ प डॉ. रवींद्रजी भोळे यांनी येथे व्यक्त केले.सम्राट बहुउद्देशीय जनजागृती सेवाभावी संस्था अंतर्गत साने संगीत लोककला मंच वार्षिक स्नेहसंमेलन २०२४ उरुळी कांचन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.आयोजन शिवराज ज्ञानोबा साने यांनी जिजामाता सभागृह उरुळी कांचन याठिकाणी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभेदार मेजर निवृत्ती आर्मी बाळासाहेब पाटोळे उपस्थित होते. याप्रसंगी सरपंच अमित बाबा कांचन, पंचायत समितीचे माजी उपसभापती हेमलता बेडेकर, अभिनेता सतीश रावजादे, साजिद मुलानी, संस्थेचे अध्यक्ष रेखा शिवराज साने, जिल्हा अध्यक्ष विजय तुपे, प्रभाकर खरात, जेष्ठ समाजसेवक डॉ रवींद्र भोळे, अरुण खरात, भीमराव घायवण, सुरवसे, शिंदे, दत्ता सोळुंके, विकास साने आदी मान्यवर उपस्थित होते. निमंत्रित पत्रकार बांधवांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला यामध्ये सहदेव खंडागळे, सुवर्णा कांचन दै सकाळ प्रतिनिधी हवेली, दैनिक सामानाचे प्रतिनिधी भाऊसाहेब महाडिक, सुनील तुपे, सुरेश वाळेकर, संतोष वाघमारे, प्रकाश म्हस्के, आनंद वैराट, सिद्धार्थ ढाले, अनिल गायकवाड, शिवाजी पारेकर, सदाशिव कांबळे तसेच सर्व संगीत कलावंत क्लास घेणारे विद्यार्थ्यांचाही व कला मंचाचे सर्व सदस्य, पालक यांचाही सत्कार समारोह संस्थेच्या अंतर्गत करण्यात आला. कार्यक्रमाची रूपरेषा मान्यवराच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सामूहिक स्वागत गीत, शिवछत्रपती शिवाजी महाराज पोवाडा, अभंग, भावगीत, भक्तीगीत, महापुरुष गीत, जनजागृतीच काही गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. संस्थेच्या अंतर्गत घेण्यात येणारे उपक्रम टेलरिंग प्रशिक्षण देणे, झाडे लावा झाडे जगवा संगीत कला प्रशिक्षण देणे याबाबत माहिती प्रास्ताविक मध्ये शिवराज साने यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहदेव खंडागळे यांनी केले. आभार अमोल भोसले यांनी मानले.
Post Views: 56