हरवली माणसाची माणुसकी
भरला स्वार्थी कपटाचा बाजार
कोण जाणतो या बोल मनाचे
भावनांच्या विक्रीचा हा आजार
घरे शेणा मातीची होती तेव्हा
आपुलकीचा ओलावा होता
सिमेंट क्राकेटच्या भिंतींमध्ये
हल्ली उरला फक्त दुरावा आता.
मनामनातील माणुसकीची
आटली माया ममता सारी
छल कपटाची उलटी गंगा
वाहते दोन्ही बाजूने भारी
पत्राची वाट पाहण्याणी मजा
मोबाईल मध्ये राहीलीचं नाही
टाईमपास करण्याचे खेळणे,
प़ोष्टमन दारात पाहीलाचं नाही
हल्ली प्रेमाचे सोंग फसवे आहे
लुबाळतात हे साध्या माणसाला
खोट्याचे खरे केले जाते वेळीचं
सारेच टपले इथे फसवाला.
रक्ताच्या नात्यात वैरी लपलेत
खेकड्यांची आहे खोगीर भरती
टपून बसले हे लोभी लालसी
कसा विश्र्वास ठेवू कुणावरती.
अनिता देशमुख
नांदुरा (बुलढाणा)
हमू..कल्याण
Post Views: 285