मानवत : येथील राजश्री भास्करराव मुंडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएचडी पदवी प्रदान केली आहे. राजश्री मुंडे यांनी राज्यशास्त्र विषयात संशोधन केले असून "पंकजा गोपीनाथ मुंडे, राजकीय नेतृत्व: एक अभ्यास" या विषयावर त्यांनी शोध प्रबंध सादर केला. देवगाव रंगारी येथील आसाराम भांडवलदार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नवनाथ आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन केले. मुंडे यांनी राज्यशास्त्र विषयात एम. फिल. पूर्ण केले असून सहा.प्राध्यापक पदासाठी राज्य पात्रता परीक्षेमध्येही (सेट) यश संपादन केले आहे. के. के. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे यांच्या त्या कन्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार कत्रुवार, उपाध्यक्ष अनिलराव नखाते, सचिव बालकिशनजी चांडक, कोषाध्यक्ष रामचंद्रराव कत्रुवार, सहसचिव विजयकुमार दलाल, संचालक दिलीपराव हिबारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक वरिष्ठ प्राध्यापक डॉ. बाबासाहेब डोळे, प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप, माजी संचालक डॉ. भारती गवळी, राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. सुजाओद्दीन शाकीर, डॉ. पंडित लांडगे, प्रसाद जोशी यांनी अभिनंदन केले.
Post Views: 101