जनतेची आवाज म्हशीचे व बकऱ्यांचे खरेदी-विक्री बाजार चालू करण्यात यावे


अखेर वरवड बकाल कृषी उत्पन्न बाजार समितीकडून भरविण्यात आलेला आहे गुरांचा बाजार
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  29 Oct 2022, 5:29 PM
   

स्वप्निल देशमुख (खास बातमी) : कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर यांच्याकडून आज दिनांक 29 ऑक्टोंबर 2022 रोजी म्हशी व शेळींचे बाजार भरवण्यात आलेले आहे मागील भरपूर दिवसापासून लंपी आजारामुळे खूप लोकांचे जनावरे दगावलेल्या असल्याने शेतकरी वर्ग हा आर्थिक परिस्थितीमध्ये दिसू लागला आहे तसेच मागील पावसामुळे शेतकरी वर्गांचे खूप भारी प्रमाणात नुकसान झालेले असल्याने व शासनाने आतापर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान ची भरपाई केली नाही त्याच्यामध्ये शेतकऱ्यांवर आलेले लंपी, आजार चे संकट काही जनावरांना लसा देऊन सुद्धा संग्रामपूर तालुक्यामधील बरेचशे जनावरे दगावलेली आहेत संग्रामपूर तालुक्यातील गोरगरीब जनतेची आवाज होती की जनावरांचे बाजार चालू करण्यात यावे त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती वरवट बकाल येथे  बकऱ्या म्हशी व मेंढरे विकण्यासाठी बरेचसे तालुक्यातील खेड्यापाड्यावरचे मोल मोजुरी करणारे व शेतकरी वर्ग दिसू लागले मागील काही गेल्या दिवसापासून लांबी आजार चालू असल्याने बकऱ्यांचे व म्हशीचे व्यापारी सुद्धा त्रस्त झाले होते वरवट बकाल गुरांचा बाजार मध्ये खामगाव आसलगाव शेगाव नांदुरा मलकापूर आकोट हिवरखेड तेलारा मालेगाव जळगाव जामोद आणि वरवट बकाल तालुक्यामधील सर्व तालुक्यातील लोक आपापल्या जनावरांची उलाढाल करण्याकरिता वरवट बकाल मध्ये भरलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुरांच्या बाजार मध्ये उपस्थित होते.

लंपी आजारामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदेश पारित झाले होते की गुरांचे बाजार कडकडीत बंद करण्यात यावे, आज रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वरवट बकाल येथे गुरांचा बाजार भरण्यात आला असून वरिष्ठांचे आदेश पारित झालेले आहेत का...
आबाराव इंगळे, सामाजिक कार्यकर्ते
वरवट बकाल

    Post Views:  180


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व