लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र संघटन प्रमुख भगीरथ बद्दर तर बिड जिल्हाध्यक्षपदी रामराजे देशमुख
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
19 May 2023, 5:30 PM
अकोला-- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या महाराष्ट्र राज्य संघटन,संपर्क तथा प्रसिध्दी प्रमुख पदावर परळी येथील ज्येष्ठ पत्रकार पोलखोल वृत्तपत्रांचे मुख्य संपादक श्री भगीरथ बद्दर यांची तर बिड जिल्ह्याच्या अध्यक्षपदावर पत्रकार श्री रामराजे देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्रात संघटन बळकट करून विस्तार करण्यासाठी व बिड जिल्ह्यात पत्रकार कल्याण आणि सामाजिक प्रश्नांचे निराकरण करून एका सक्षम संघटनेचा परिचय सिध्द करण्यासाठी मराठवाड्यात ह्या दोन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
श्री भगीरथजी बद्दर हे मराठवाड्यातील वृत्तपत्र क्षेत्रात आणि सामाजिक आणि राजकीय वर्तुळात सक्रिय असलेले एक यशस्वी नेर्तृत्ध आहे.तर श्री रामराजे देशमुख हे परळीचे माजी आमदार व स्वातंत्र्य संग्राम सैनिक श्री लक्ष्मणरावजी देशमुख यांचे सूपूत्र आहेत.त्यामुळे कुटूंबातूनच सामाजिक वारसा घेऊन ते सुध्दा मराठवाड्यातील सामाजिक वर्तूळात सुपरिचित आहेत.या दोन्ही नियुक्त्यांबद्दल त्यांचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या पदाधिकारी आणि सभासदांनी अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
Post Views: 116