आरटीओच्या वॉकथॉनमध्ये एल. आर. टि. काॅलेज च्या एन. सी. सी. कैडेट्सचा उत्कृष्ठ सहभाग


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  21 Nov 2022, 5:59 PM
   

दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालयाचे एन. सी. सी. कैडेट्सने आरटीओ च्या वॉकथॉनमध्ये वाहतूक नियमांचा जागर करतांना उत्कृष्ठ असे सहभाग दर्शविला. रस्ता अपघातात बळी ठरलेल्या नागरिकांसाठी जागतिक स्मृती दिनानिमित्त येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने रविवारी दि.२० नोव्हेंबरला वॉकथॉनचे आयोजन करून वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यात आली. संत तुकाराम चौकातून या वॉकेथॉनला हिरवी झेंडी दाखविली. वॉकेथॉन रैली आर.टी.ओ. मैदानावर पोहोचल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी रॅलीला संबोधित करून त्यांनी स्वलिखित रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा दिली. लहान बाल कलाकारांनी पथनाट्य तू तुझा रक्षक सादर करून, रस्ता सुरक्षा नियम पाळणेबाबत संदेश दिला. रस्ता अपघातात आपला जीव गमावलेल्या नागरिकांसाठी एक मिनिट स्तब्ध राहून त्यांना श्रद्धांजली वाहन्यात आली. यावेळी  श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालयाचे एन. सी. सी. कैडेट्स  सिनियर अंडर ऑफिसर रोहित डिगे, कॉर्पोरल सागर वानखडे, कॉर्पोरल कार्तिक लाडगे, कॅडेट प्रणव इंगोले, कॅडेट जय नांदोडे, कॅडेट रोशन इंगोले, कॅडेट प्रणव वानखेड़े, कॅडेट अरविंद कुमार यादव, कॅडेट महेश मोकलकर, कॅडेट धनंजय लाटे, कॅडेट रोहन साबे, कॅडेट साहिल बुंदेले यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

    Post Views:  185


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व