गायत्री नगरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडीत
विभागीय इन्चार्जची टोलवा टोलवीची उत्तरे; ऐन उन्हाळ्यात गायत्री नगरात अघोषित अमर्याद भार नियमन
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
23 May 2023, 7:32 PM
अकोला - कौलखेड फ्युज कॉल सेंटर अंतर्गत गायत्री नगरातील वीज पुरवठा गेल्या एक ते दीड वर्षा पासुन वारंवार खंडीत होत आहे. सदर बाब नागरिकांनी विद्युत कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांन व्यतिरिक्त उच्च अधिकाऱ्यांच्या निदेर्शनात आणुन देण्याचा अनेक वेळा प्रयruत्न केला प्रयेक जण आपल्याला वरची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निष्पन्न होत आहे . कौलखेड परिसर इन्चार्ज देवर हे कायम स्वरूपी काही ना काही तांत्रिक अडचणीचे सबब पुढे करुन वेळ मारून नेत असल्याचे स्पष्ट होत आहे जितके वेळा सूचना देऊन विद्युत पुरवठा खंडित होतो त्या पेक्षा जास्त बिना सुचना पुरवठा खंडीत होतो. कधी एक फेज तर कधी दोन्ही फेज बंद होतात. अनियमित दाबाचा विद्युत पुरवठा हा नित्याचाच भाग झाला आहे.
खदान सारख्या स्लम विभागात पण एवढा विदुयत पुरवठा खंडीत होत नाही. एक तर फिडर बदला, किंवा इन्चार्ज बदला, अशा नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत आहे. सदर विभागातील वीज दुसरीकडे वळविण्यात येवुन विकल्या तर जात नाहीना ? याची चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती नेमुन जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करुन नागरिकांनी संबंधित विभागातील नागरिकांना न्याय दयावा अशी सभ्य नागरिकांन कडुंन मागणी होत आहे.
Post Views: 177