हे शहर आता अपराजित आमदाराचा मतदारसंघ, अभिनेत्री प्राजक्ता माळीकडून शिवसेनेच्या या आमदाराचं तोंडभरून कौतुक


प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळीने यवतमाळमध्ये एका शिवसेना आमदाराचं तोंडभरून कौतुक केलंय.
 Chief Editor  26 Dec 2021, 8:47 PM
   

यवतमाळ :-प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळीने यवतमाळमध्ये एका शिवसेना आमदाराचं तोंडभरून कौतुक केलंय. दिग्रस हे शहर आता अपराजित आमदार संजय राठोड यांचा मतदारसंघ म्हणून ओळखलं जातं, असं वक्तव्य प्राजक्ता माळीने केलं. यानंतर राठोड समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. संजय राठोड यांनी त्यांच्या मतदारसंघातील दिग्रस येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नाट्यगृह आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व्यापारी संकुल या इमारतींच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी प्राजक्ता माळी, महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम कलावंत अरुण कदम व समीर चौगुले उपस्थित होते. यावेळी प्राजक्ता माळी बोलत होती.

प्राजक्ता माळी म्हणाली, संजय राठोड यांनी या शहराचा चेहरामोहरा बदलला. कबड्डी खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवणारं हे शहर आता अपराजित आमदार संजय राठोड यांचा मतदारसंघ म्हणून ओळखलं जातं. यात सर्वकाही आलं.

    Post Views:  263


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व