गोवा येथे नामदेव शिंपी समाजाचा स्नेहमिलन मेळावा


बाळासाहेब आंबेकरांची प्रमुख उपस्थिती
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  10 Aug 2022, 2:00 PM
   

पणजी- गोवा येथे नामदेव शिंपी समाजाचा स्नेहमिलन मेळावा रविवार दिनांक ७ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. 
      या मेळाव्याला श्री बाळासाहेब आंबेकर, अध्यक्ष श्री केशवराज संस्था पंढरपूर. विश्वस्त नामदेव समाजोन्नती परिषद, संस्थापक विश्वस्त अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली, अध्यक्ष अधिस्वीकृतीधारक जेष्ठ पत्रकार संघटना  महाराष्ट्र.  तसेच अध्यक्ष महाराष्ट्र मुद़ण परिषद  हे प़मुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
   यावेळी गोव्यातील मोठ्या संख्येने कुटुंबे मुला - बाळासह उपस्थित होती. यानिमित्ताने संपूर्ण दिवस भर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते त्यामध्ये डिंक लाडू स्पर्धा, रांगोळी स्पर्धा विविध खेळ यांचे आयोजन केले होते. तसेच विद्यार्थ्यांचा आणि जेष्ठ समाज बांधव यांचा सत्कार श्री बाळासाहेब आंबेकर यांचे हस्ते करण्यात आला. समाजाच्या चांगल्या एकजूटीचे आदर्श वास्तव दर्शन यावेळी पहायला मिळाले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट प़कारे आयोजन समाजाचे अध्यक्ष नागेंन्द़ व्हावळ, सचिव सुधीर कुबडे आणि रमेश भिंगे, हिरवे आदी समाज बांधवांनी केले.यावेळी अनेक उपक्रम आयोजित करण्यासाठी स्वेच्छेने लोकवर्गणी जाहिर करुन मोठा आर्थिक लावला.

    Post Views:  216


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व