नरंगल येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळे मध्ये तळयाचे स्वरूप.!
देगलूर : तालूक्यातील नरंगल येथील सततच्या पावसामुळे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या मैदानात पाणीणे पूर्णपणे तुडूंब भरले आहे.शाळकरी मुला मुलींना शाळेतील मैदानात असलेल्या पाण्यातून प्रवेश करावा लागत आहे.शाळेतील शिक्षण घेणाऱ्या मुला मुलीना शिक्षण घेणे अवघड झाले आहे.या पाण्यामूळे मूलांच्या आरोग्य धोक्यात येण्याची शंका नाकारता येत नाही.गावातील पालकवर्गातून चिंतेची नाराजी पहावयास मिळत आहे.जिल्हा परिषद शाळा म्हणजे गरीबांची शाळा म्हणून ओळखली जात आहे. गोरगरीब जनतेला खाजगी शिक्षण परवडत नसल्यामुळे लोकांनी जिल्हा परिषद शाळे मध्येच आपल्या मुलांना शिक्षण घेण्यास सोविस्कर मानली जात आहे.संबंधित विभागाने या शाळेची योग्य ती दखल घेऊन शाळेच्या मैदानाची दुरूस्ती करण्यात यावी म्हणून लोकांचे संबंधित विभागाकडे लक्ष लागले आहे.
Post Views: 64