बार्शीटाकळी पुरवठा विभागातर्फे राबवण्यात आला नावीन्यपूर्ण उपक्रम


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  05 Jul 2025, 8:39 AM
   

अकोला - अन्न व नागरी पुरवठा विभाग तहसील कार्यालय बार्शीटाकळी जिल्हा अकोला यांच्या वतीने रास्तभाव दुकानदारांना प्रोत्साहन मिळावे व त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक व्हावे. याकरिता एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. शासनाने धान्य वितरणाकरिता माहे जून, जुलै व ऑगस्ट या तिन्ही महिन्याचे एकत्रित धन्य वितरण करण्याचे उद्दिष्ट हाती घेतले. याकरिता दि. 25 मे रोजी जिल्हास्तरावर जिल्हा पुरवठा अधिकारी अकोला यांच्या मार्गदर्शनात रास्त भाव दुकानदारांची एक मीटिंग घेण्यात आली. त्यावेळी तिन्ही महिन्याचे धान्य एकत्रितरित्या वाटपाचा निर्णय घेण्यात आला. हे कठीण असे कार्य असले तरीही अशक्य नाही. म्हणून कमी वेळात धान्य वितरण करून लाभार्थ्यापर्यंत पोहोचायचे. या उद्दिष्टावर काम करायला सुरुवात झाली. हे उद्दिष्ट हाती घेऊन काम करत असताना बार्शीटाकळी अन्न व नागरी पुरवठा विभाग हा निरीक्षण अधिकारी श्री आनंद गुप्ता यांच्या नेतृत्वात कामाला लागला. शासनाचा उद्देश यशस्वी करण्यासाठी धडक मोहिम हाती घेतली. आधी तालुकास्तरावर दुकानदाराची सभा घेऊन त्यांना शासनाच्या या संकल्पनेची माहिती दिली. आणि तात्काळ वाटप करण्यास धान्य उपलब्ध करून दिले. शासनाच्या या उद्देशाला सहकार्य करत बार्शीटाकळी तालुक्यातील रास्त भाव दुकानदार यांनी अल्पावधीतच आपल्या दुकानातील सर्व लाभार्थ्यांना धान्य वाटप करून शंभर टक्के वाटपाचा टप्पा पूर्ण केला. यामध्ये प्रामुख्याने
सुनिता दिलीपअप्पा कोरे (पिंजर), फैझान राजा मुज्जीबुद्दिन पठान (बार्शीटाकळी), विष्णू शिवराम लोखंडे (जांभरुण), सुरेन्द्रा शामराव चव्हाण (फेट्रा), रामेश्वर डीगान्बर चोपडे (जणुना राजनखेड), शेख जमीर शेख करीम (बार्शीटाकळी शहर), ईश्वर नामदेवराव राउत (भेंडगाव),  अशोक किसान लोनाग्रे (पिंजर) , प्रवीण वामनसा बुलबुले (बार्शीटाकळी शहर), कैलाश शंकर जाधव (राजनखेड तांडा), एम एम हुसेन (बार्शीटाकळी शहर), धर्मविर गवई (विझोरा) ...इ. हे रास्तभाव दुकानदार होते. सदर रास्तभाव दुकानदार यांनी शासनाच्या या उद्देशाला सहकार्य करत केलेले कार्य हे कौतुकास्पद असल्यामुळे त्यांच्या कार्याचे नक्कीच कौतुक व्हावे व इतर दुकानदारांनाही त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी यासाठी दिनांक 4 जुलै 2025 रोजी बार्शीटाकळी येथे शंभर टक्के वाटप पूर्ण करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बार्शीटाकळी तहसीलचे तहसीलदार श्री राजेश वजीरे साहेब हे उपस्थित होते. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून अकोला जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री रविंद्र यन्नावार साहेब यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून 100% धान्य वितरण करणाऱ्या रास्तभाव दुकानदारांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला. कार्यक्रमाला सुरुवात करतांना मन व चित्त शुध्दी व्हावी याकरीता "हिच आमची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे" या सुंदर प्रार्थनेने केलेली सुर्वात हा एक अप्रतिम पायांडा असल्याचे गौरवोद्गार काढले. सोबतच बार्शीटाळीचे तहसिलचे श्री ए. एस. सोनवणे साहेब (निवासी नायब तहसीलदार) श्री अतुल नागे साहेब (नायब तहसीलदार) जिल्हा तांत्रिक कर्मचारी श्री सचिन काळे नासीर खान (अव्वल कारकुन) रास्तभाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्री सुरेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष धर्मविर गवई सचिव प्रविण बुलबुले राजुभाऊ सिरसाट उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद गुप्ता यांनी तर तांत्रिक कर्मचारी महादेव लुले यांनी यानी अप्रतिम सुत्रसंचलन केले. वसिम खान यांनी उपस्थीतांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला उपस्थित इतर सर्व रास्त भाव दुकानदारांनी सुद्धा आपणही याचप्रमाणे अल्पावधीतच 100% धान्य वितरण करायचे असा निर्धार व्यक्त केला.

    Post Views:  207


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व