अपक्षांना मते देऊन मतविभागणी करू नका- संजय शेळके


 विश्व प्रभात  2024-11-18
   

वैभव हराळ-जिल्हा प्रतिनिधी 
 श्रीगोंदा - श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत खूप मोठे  संशयास्पद वातावरण आहे.येथे भाजप,शिवसेना , मनसे उमेदवारांसह १६ अपक्ष उमेदवार उभे आहेत.हे अपक्ष मतदान विभागणी करण्यासाठी तर उभे केले तर नाही ना, अशी शंका निर्माण होते आहे. याचा फायदा नक्की कोणाला होणार आहे?असा प्रश्न मनसे उमेदवार संजय शेळके यांनी केला आहे. मी नक्कीच तुम्हाला सांगतो की ही शक्कल शोधून काढणारे  नेते जनतेला फसवणारे आहेत. तरी आपण पक्षाने  तिकीट दिलेल्या उमेदवारांनाच मतदान करावे. अन्यथा आपली मते विभागली  जातील‌. यामुळे कोणतेही सरकार बनवतांना  अडचणी होतील. याचा आपण विचार करून मतदान करावे. जशी जनतेची इच्छा तसाच निकालही लागेल .तुम्ही आम्ही निर्माण केलेला मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष भविष्यातही कदाचित आपल्यासाठी सरकार बनवण्यास सोयीचा ठरेल. सर्व हिंदू मतदार बंधुंनी जागे व्हावे, पुन्हा ही वेळ येणार नाही. पश्चाताप होऊ नये म्हणून आपले कर्तव्य आहे की एकदा का होईना मतदान करा. आपल्या  मुलांना शिक्षण मिळण्यासाठी आणि नोकरी मिळवण्यासाठी धडपड करावी लागणार नाही.  महाराष्ट्रामधील कंपनी मध्ये फक्त आपलीच मुले काम करतील. बाहेरील राज्यातील 
मुलांना इथे काम मिळणार नाही. महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांसाठी रोजगार निर्मिती करण्यात येईल. आपण श्रीगोंदा विधानसभेतून मला विजयी करावे.राज ठाकरे साहेब यांनी आज पर्यंत हिंदू धर्म सोडणार नाही हे ब्रीद पाळले आहे, जपले आहे. त्यामुळे त्यांच्या आदर्शा खाली मी देखील तेच काम करेल  !

    Post Views:  326


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व