शेजारी फाऊंडेशन कडून साहित्यिक पंजाबराव वर सन्मानित


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  17 Mar 2025, 8:15 AM
   

अकोला : ़जूने खेतान नगर कौलखेड येथील शेजारी फाऊंडेशनच्या वतीने न्यु महसुल कॉलनी खडकी येथील रहीवासी सामाजिक कार्यात सदैव तत्पर असलेले साहित्यिक, कवी साप्ता. नारी ललकारचे संपादक पंजाबराव वर यांना स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन  समस्त नारी शक्तीद्वारा  महिला दिनाचे कार्यक्रमात सन्मानीत करण्यात आले.  परिसरातील  १५ ज्येष्ठ व सेवानिवृत्त कर्तृत्ववान नारी शक्तींचा देखिल सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. साहित्यिक पंजाबराव वर यांचे ‘गाथा रमाईची’ चरीत्रगाथा, महानायक बिरसा मुंडा, लघु चरीत्र, भ्रूण कन्येचा टाहो कवितासंग्रह, व-हाडी झटका काव्यसंग्रह ही पुस्तके प्रकाशित असून साप्ताहिक नारी ललकार हे वृत्तपत्र महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी सदैव तत्पर आहे. त्यांचे सामाजिक, साहित्यिक कार्य बघून शेजारी फाऊंडेशनने त्यांना सन्मानित केले. यावेळी शेजारी फाऊंडेशनच्या अल्पना विजयकुमार गडलिंगे, भावना जोशी, डॉ. तृप्ती बदरखे, अ‍ॅड. संध्याताई काशिद, मनीषा तामसे, पूजा साळुंके, सोनू चौधरी, मिना चौधरी, राखी सांगळे,  हर्षा काळे, वीणा मंत्री, शीतल कनोजिया, मनिषा भुसारी, गायत्री जडी, कविता कोल्हे, सुषमा सबनीस,  वर्षा सरजोशी, सुवर्णा गावंडे, ज्योती चौधरी यांची उपस्थिती होती.  महिला दिन कार्यक्रमाचे बहारदार संचालन वृषाली पवार व  भावना जोशी  यांनी तर आभार प्रदर्शन सुवर्णा गावंडे यांनी मानले.

    Post Views:  75


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व