महसूल कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन


अव्वल कारकून यांना नायब तहसीलदार पदी पदोन्नतीची मागणी
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  05 Dec 2022, 8:50 AM
   

अकोला-अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्याची प्रक्रिया रखडली आहे.अनेक कर्मचारी पदोन्नती विनाच सेवानिवृत्त होत आहेत. सदर पदोन्नत्या देण्यात याव्या या मागणीसाठी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने १ डिसेंबर पासून काळ्या फिती लावून काम करण्यास सुरुवात केली.
अमरावती विभागामध्ये अव्वल कारकून ते नायब तहसिलदार या संवर्गात दरवेळी पदोन्नत्यांबाबत होत असलेला विलंब अव्वल कारकूनांना जाचत ठरत आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी पदोन्नती न मिळताच सेवानिवृत्त होत आहेत. सबब पदोन्नती बाबत होत असलेल्या संथ प्रक्रियेविरोधात महसूल कर्मचारी एकजूट झाले असून त्यांनी मागणी मान्य न झाल्या टप्प्या-टप्प्याने आंदोलनाचा इशारा दिला आहे. यासंबंधीचे निवेदन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना देण्यात आले आहे. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने आंदोलनाला गुरुवार पासून सुरुवात करण्यात आली. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात कर्मचाऱ्यांनी गुरुवारी काळ्या फिती लावून काम केले.
यामध्ये जिल्हाध्यक्ष वैजनाथ कोरकने, सचिव संतोष कुटे, मंगेश पेशवे, नितीन निंबोळकर, निलेश दामोदर, योगेश खांदवे, प्रसाद देशमुख, विलास जाधव, अमोल लोखंडे, दिनेश सोनोने, संतोष इंगळे, ज्योती नारगुंडी, रत्ना बाजारे, संध्या ठाकरे, वंदना वानखडे, वर्षा भुजाडे, उमा गावंडे आदी सहभागी झाले होते.

अशी आहे आंदोलनाची रूपरेषा
- ३ डिसेंबर पर्यंत काळ्या फिती लावून काम करणे. 
- ५ डिसेंबर रोजी निदर्शने. ९ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयापुढे पदाधिकाऱ्यांचे धरणे. 
- १३ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयापुढे पदाधिकाऱ्यांचे उपोषण. 
- २१ डिसेंबर रोजी एक दिवसांचे लेखणी बंद आंदोलन.
- २३ डिसेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप व २६ डिसेंबर पासून बेमुदत संप करण्यात येणार आहे.

    Post Views:  202


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व