सीमा हल्लुर यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार _२०२३
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
30 Oct 2023, 9:07 AM
सरदार वल्लभभाई पटेल जयंती , राष्ट्रीय एकात्मता दिन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारंभाचे औचित्य साधून डॉक्टर मणीभाई मानव सेवा ट्रस्ट तर्फे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या पुणे येथील एरंडवणा माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका सीमा हल्लुर यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार -२०२३ शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल जाहीर झाला आहे. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे महान कार्य करीत आहेत.सेवाभावी वृत्ती व समाजसेवेच्या कार्याचा गौरव म्हणून सरदार वल्लभाई पटेल यांच्या जन्मदिनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
Post Views: 135