मुकुंद प्रिंटिंग प्रेसचे संचालक बालमुकुंद अग्रवाल यांचे निधन


सांयकाळी अंत्य संस्कार
 संजय देशमुख  17 Dec 2021, 12:23 PM
   

अकोला दि १७ : अकोला जिल्हा पत्रकार संघाचे माजी कोषाध्यक्ष व मुद्रक संघाचे पदाधिकारी आणि मुकुंद प्रिंटिंग प्रेसचे संचालक धार्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत बालमुकुंद कपूरचंद अग्रवाल यांचे आज वयाच्या ७८ वर्षी निधन झाले.गणेश मुकुंद प्रिंटिंगचे संचालक देवेंद्र सतीश विद्याधर यांचे ते वडील होते. आज शुक्रवार दि.१७ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मराठा नगर येथून अंत्ययात्रा निघुन, मोहता मिल मोक्षधाम येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये सातत्याने पुढाकार घेणारे बालमुकुंद अग्रवाल यांनी अकोला शहरात १९७४ मध्ये फोर कलर प्रिंटिंग उपलब्ध करून दिली. रामदेवबाबा व राणीसती यांचे परमभक्त होते.त्यांच्यामागे भाऊ, नातवंड तीन मुली व मोठा आप्तपरिवार असून संत गाडगेबाबा संस्थानाची सुद्धा त्यांचा निगडित संबंध होता. मुंबई गाडगेबाबा धर्मशाळा व गाडगेबाबा यांचे साहित्य प्रकाशनात त्यांचा पुढाकार होता.गाडगेबाबा यांच्या जन्मस्थानी कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी त अग्रणी असत. रामदेवबाबा सेवा समितीची पदाधिकारी होते.

    Post Views:  291


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व