दारूच्या नशेत गाड्या चालविणाऱ्या ४२ जणांवर. गुन्हे,मॉडीफाईड १२ सायलेंसर जप्त
वाहतूक निरीक्षक विलास पाटील आणि टीमची दबंग कारवाई सुरूच राहणार!
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
15 Sep 2026, 8:30 AM
अकोला - अकोला येथे पुनरागमन झालेले वाहतूक पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांना सोबत घेऊन आज गणेशोत्सवाच्या गर्दीतील बेताल वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी धडक कारवायांचा शुभारंभ केला आहे. वाहतूक नियंत्रण शाखेने बिनापरवाना मॉडिफाईड केलेले बुलेट सायलेंसर चालक मालक यांच्या विरुद्ध मोटार वाहन कायद्याचे अंतर्गत कायदेशीर कार्यवाही करीत 12 सायलेंसर जप्त केलेत.मा पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक सर यांनी वाहतूक शाखेस अपघात कमी करावे व वाहतुकीला शिस्त लावावी असे आदेश दिलेत.त्यानुसार वाहतूक पोलिसांनी जिल्हा भरात महत्वाच्या चौकात नाकाबंदी केली.या दरम्यान दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची ब्रिथ आनलायझर व्दारा तपासणी केली असता,४२ वाहन चालक दारूच्या नशेत मोटर सायकल वाहन चालवितांना आढळून आलेत.
त्यांच्या रक्ताच्या तपासणीतून श्वासामध्ये अल्कोहोल चे प्रमाण सापडल्याने सदर वाहन चालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 185 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे मॉडिफाईड केलेले मोठ्या आवाजचे १२ सायलेंसर जप्त करून मोटार वाहन कायदा कलम 194F. 198 अन्वये कायदेशीर कार्यवाही केली आहे, नागरिकांनी दारू पिऊन वाहने चालवू नयेत,तसेच मॉडिफाईड केलेले मोठ्या आवाजांच्या सायलेंसरचे वापर करु नयेत असे आवाहान वाहतूक शाखेने सर्व वाहन चालकांना केलेले आहे .
Post Views: 1