अकोला : विदर्भ साहित्य संघ शताब्दी वर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघ अकोला शाखा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन स्व. बाजीराव पाटील साहित्य नगरी , प्रभात किड्स स्कूल परिसर , वाशिम रोड , अकोला येथे येत्या ०५ व ०६ नोव्हेंबर २००२ रोजी केलेले आहे.. आज संमेलन कार्यालयात संमेलन सहयोगी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची एक विचार सभा संपन्न झाली.
दोन दिवस चालणाऱ्या ह्या राज्यस्तरीय युवा संमेलनात युवा वर्गाचा तरुणाईचा वैचारिक जल्लोष रंगणार आहे. या दोन दिवसीय संमेलनात दोन परिसंवाद , निमंत्रितांचे कवी संमेलन , टॉक शो ह्या कार्यक्रमासह विविध दालने कवीकट्टा, गझलकट्टा, वऱ्हाडीकट्टा, संगीतकट्टा असे विविध दालने राहणार असून त्यामध्ये सर्व तरुणाईला सहभागी होता येईल तरी जास्तीत जास्त युवकांनी या संमेलनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजन समिती विदर्भ साहित्य संघ व संमेलन सहभागी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केले असून ह्या विचार सभेला अकोल्यातील सहयोगी संस्थांचे प्रतिनिधी सर्वश्री शरद वानखडे, राजेश ताले, प्रतीक ताले, राहुल ताले, संदीप देशमुख, रवींद्र जवादे, सौरभ पोफळी, डॉ. रामेश्वर बरगट, डॉ. गजानन वाघोडे, सौ. लता कराळे, नंदकिशोर चिपडे, रवीद्र भुलनकर, प्रबोध देशपांडे, प्रदीप सिंह राजपूत, निलेश कवाडे, निलेश देवकर, विद्या राणे, अशोक ढेरे, विजय देशमुख, डॉ.. गजानन नारे, सौ. सीमा शेटे -रोठे, डॉ. साधना कुळकर्णी, विजय कौसल, सुरेश पाचकवडे, प्रा. निशा बाहेकर प्रा. डॉ. सुहास उगले , डॉ. विनय दांदळे, मोहिनी मोडक, डॉ. गजानन मालोकार, डॉ. दिलीप इंगोले यांचे सह उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त युवकांनी संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
Post Views: 215
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay