अकोला : कुटासा तालुका अकोट जिल्हा अकोला येथील साहित्य कला सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी संस्था म्हणून तरुणाई फाऊंडेशन कुटासा या संस्थेकडे पाहिले जाते. . साहित्य चळवळीसाठी देण्यात येणारा शब्दवेलचा हा पुरस्कार मानाचा पुरस्कार असून हा पुरस्कार 4 ऑक्टोंबर 2025 रोजी पार पडलेल्या शेंगाव येतील मथुरा लां न येथे पार पडलेल्या शब्दवेल साहित्य संघ पनवेल द्वारा आयोजित राज्यस्तरीय पाचवे शब्दवेल साहित्य संमेलन मध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांच्या शुभहस्ते संस्थेला शाल श्रीफळ सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हे विशेष अकोला जिल्ह्यातील साहित्य चळवळ जिवंत ठेवण्यासाठी जिल्ह्यातील नवो दित साहित्यिकांना हक्काच विचारपीठ मिळवून देण्यासाठी तरुणाई फाउंडेशन गेल्या दहा वर्षापासून कार्य करीत आहे. या कार्याची नोंद म्हणून शब्दवेल साहित्य संघ पनवेल यांनी हा पुरस्कार संस्थेला बहाल केला आहे. त्यावेळी विचारपीठावर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष एड. धनराज वंजारी स्वागत अध्यक्ष विनायक भारंबे प्रमुख अतिथी म्हणून संजय माणिकराव देशमुख पुष्कराज गावंडे प्रतिभा सराफ शब्दवेल चे संस्थापक प्रवीण बो पुलकर प्रा. राजेश मिरगे आदींच्या उपस्थितितीत संस्थेचे अध्यक्ष श्री संदीप देशमुख विक्रम सोनी मंजू झांबरे सुलभा देशमुख रिता देशमुख सूर्यकांत शास्त्री विनायक काळे महादेव लुले आदि सदस्यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा वरणकर तर आभार देवेंद्र इंगळकर यांनी मांडले.
Post Views: 88
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay