शब्द सृष्टी राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात सौ. नयना देशमुख यांचा सहभाग


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  17 Mar 2022, 1:59 PM
   

अकोला  : शब्द सृष्टी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अकोला येथे झालेल्या पहिल्या महिला साहित्य संमेलनात बुलडाणा येथील कवयित्री सौ. नयना देशमुख यांनी आपल्या बहारदार विनोदी काव्यरचनांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या विनोदी काव्याने वातावरण हास्यमय होऊन रसिकांनी पसंतीची दाद दिली. 
अनेक सहित्य संमेलनात सहभागी होऊन रसिकांसमोर आपल्या विनोदी कविता सादर करणार्‍या नयना देशमुख ह्या सारस्वताच्या प्रांगणातील एक उदयोन्मुख  कवयित्री आहेत. ठिकठिकाणी आयोजकांनी उपलब्ध करून दिलेल्या व्यासपिठाद्वारे काव्यरचनेच्या प्रवासाला गती आणि प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी त्या साहित्य साधनेत सक्रिय आहेत, त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

    Post Views:  294


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व