राज्यात पुढील तीन दिवसात अवकाळी पावसाचा इशारा!


मुंबई-ठाण्यासह या जिल्ह्यांना अलर्ट जारी
 Chief Editor  28 Nov 2021, 9:43 PM
   

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान गुजरात, महाराष्ट्र, गोवा राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई: राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा (Maharashtra Weather Updates) देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान गुजरात, महाराष्ट्र, गोवा राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा अलर्ट (Unseasonal Rain Alerts) जारी करण्यात आला आहे. तर दक्षिण भारतातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला आहे. राज्यात 29, 30 नोव्हेंबरला कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मेघ गर्जनेसह जोरदार पावसाचा व जोरदार वाऱ्यांचा अंदाज (weather forecast) व्यक्त करण्यात आला आहे.
नोव्हेंबर महिन्यात पडणारी थंडी कमी झाली असून हवामानात मोठे बदल होत आहेत. त्यातच आवकाळी पाऊस आला तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. 29 नोव्हेंबर रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा (Rain Alerts) देण्य़ात आला आहे. त्याच प्रमाणे 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी देखील हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
राज्यात पुढील तीन दिवसात अवकाळी पावसाचा इशारा! मुंबई-ठाण्यासह या जिल्ह्यांना अलर्ट जारी
Maharashtra Weather Alert : राज्यातील पावसासंदर्भात मोठी अपडेट! मान्सूनच्या परतीसाठी पोषक वातावरण तयार
Maharashtra weather update: राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज! या भागातील लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन
राज्यात 29, 30 नोव्हेंबरला राज्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडेल असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी मुंबई- ठाण्यासह पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी देखील पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

    Post Views:  300


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व