अकोला – आज दि. 1 जुलै 2024 रोजी नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात विदर्भात झाली असून शाळेच्या पहिल्या दिवशी मनपा उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी रामदासपेठ येथील मनपा सेमी इंग्रजी शाळा क्र.7, लक्कडगंज येथील मनपा उर्दु आदर्श शाळा क्र. 08, मनपा उर्दु कन्या शाळा क्र.05, मनपा मराठी मुलांची शाळा क्र.19, मनपा उर्दु मुलांची शाळा क्र. 11 व हिंदी शाळा क्र. 08 या शाळांना भेट दिली.
यावेळी मनपा उपायुक्त यांनी शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा पुष्प देऊन सत्कार केला. तसेच मनपा अधिनस्त शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तकांचे वितरीत करण्यात आले. याचसोबत हरिहर पेठ परिसरातील शाळेमध्ये उपायुक्त डॉ.वासनकर यांचे हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
आजपासून सुरु झालेल्या सत्राची सुरुवात करताना मनपा हद्दीतील विविध शाळांना आज मनपा उपायुक्त यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्याचे पहिल्या दिवशी स्वागत केले. आणि त्यांच्याकडून मोठया अपेक्षा व्यक्त केल्या. यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाचे बाळकडू जावे या उद्देशाने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मनपा शिक्षण विभागाचे अनवर हुसैन, अविनाश वासनिक, शाळांचे मुख्याद्यापक, शिक्षक/शिक्षिका, पालक वर्ग आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Post Views: 78
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay