लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून जेष्ठ पत्रकार प्रकाशभाऊ पोहरे यांच्या ईलना निवडीबध्दल सत्काराचे आयोजन


संघटनेचा विचारमंथन,वार्षिक सभा तथा स्नेहमिलन मेळाव्यात ईलना सदस्य संजय देशमुख व मान्यवरही होणार सन्म
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  28 Sep 2022, 9:54 AM
   

अकोला : लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या अकोल्यातून स्थापित समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या वार्षिक स्नेहमिलन मेळाव्याचे आयोजन दै.देशोन्नतीने मुख्य संपादक व इंडीयन ग्वेज न्यूजपेपर्स असोसिएशन ( ईलना) या राष्ट्रीय संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाशभाऊ पोहरे यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे.तेच या समारंभातील मुख्य सत्कारमुर्ती राहणार आहेत.
उद्या २९ सप्टेंबर रोजी स्थानिक जठारपेठेतील जैन रेस्ट्रो येथे होणाऱ्या स्नेहमिलन आणि सत्कार समारंभात ईलना उपाध्यक्षपदावर सलग तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

           याप्रसंगी ईलना राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड झाल्याबद्दल   लोकस्वातंत्र्यचे संस्थापक - राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनाही संघटना पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रकाशमान पोहरे यांचे हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी असणारे निर्माण ग्रूपचे संस्थापक- अध्यक्ष गणेशराव देशमुख,सहकार विभागातील जिल्हा उपनिबंधक विनायकजी कहाळेकर,विशेष न्यायाधिश अॕड.नितीनजी अग्रवाल,बाळासाहेब आंबेकर (सातारा),डॉ.अनुपकुमार राठी,किशोर मुटे,हिंगणघाट यांचे सुध्दा सत्कार करण्यात येणार आहेत.
             सहकार, जैविक मिशन,पत्रकारिता,समाज जागृती,विविध संघटनातील चळवळींमधून परिवर्तनाची सकारात्मकता निर्माण करण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रकाशभाऊंसारख्या नेतृत्वाचा आपल्या संघटनेकडून व आपल्या  लोकस्वातंत्र्यच्याही अध्यक्षांचा सन्मान झाला पाहिजे ही  लोकस्वातंत्र्यचे मार्गदर्शक पदाधिकारी प्रा.डॉ.संतोषजी हूशे व कादंबरीकार पुष्पराजजी गावंडे यांची ही संकल्पना आहे. त्या विषयाला सर्व पदाधिकाऱ्यांनी पाठबळ दिले.
             या सत्कार समारंभ आणि स्नेहमिलनमेळाव्यापूर्वी संघटनेचा मासिक विचारमंथन मेळावा व वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज होणार आहे.त्यानंतर ११ वाजता हा स्नेहमिलन व मार्गदर्शन मेळावा ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे सभासद,सहयोगी हितचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन केंद्रीय उपाध्यक्ष प्रदिप खाडे,किशोर मानकर,सचिव राजेन्द्र देशमुख,सिध्देश्वर देशमुख राजेश जाधव, प्रा.राजाभाऊ देशमुख, प्रा.डॉ.संतोष हूशे,पुष्पराज गावंडे,सौ.जया भारती,अंबादास तल्हार,संदिप देशमुख,डॉ.शंकरराव सांगळे. जिल्हाध्यक्ष मोहन शेळके कार्याध्यक्ष नंदकिशोर चौबे, उपाध्यक्षा निशाली पंचगाम, विवेक मेतकर, सचिव किर्ती मिश्रा, मंगेश चऱ्हाटे, राहूल राऊत व सर्व केन्द्रीय विभागीय व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

    Post Views:  243


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व