मॅक्सिकोमध्ये ट्रेनने दिली ऑईल टँकरला धडक; भीषण अपघातात पसरली मोठी आग
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
21 Oct 2022, 9:49 AM
उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जाणारी ट्रेन एका ऑइल टँकरला धडकली आणि पलटी होऊन आग लागली. या घटनेची छायाचित्रे समोर आली असून त्यात ट्रेन पूर्णपणे जळून खाक झाली आहे. त्याचवेळी घटनास्थळी हाहाकार माजला. आजूबाजूचे लोक जीव वाचवण्यासाठी धावताना दिसले.
ट्रेनला लागलेल्या आगीत आसपासची घरेही आगीच्या भक्ष्यस्थानी आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये आगीतून धुराचे लोट उठताना दिसत आहेत.दरम्यान, या घटनेत अद्याप कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त समोर आले नाही. सध्या ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.
Post Views: 142