पाणीपुरी मुळे समाज व मुलांचे स्वास्थ धोक्यात...
संतोष घरत व सुशांत संखे यांची जनजागृती
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
2023-10-25
पालघर - (संतोष घरत) :- पालघर मधील नावाजलेले बोईसर शहर ह्या शहरात संजय नगर येथे सध्या पाणीपुरीतील पुरी बनवण्याचा उद्योग वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या पुऱ्या बनवताना वापरण्यात येणारे साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असते. त्यामुळे पाणीपुरी आता नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणारा प्रकार बनला आहे.या ठिकाणी बनवणाऱ्या येणाऱ्या पुऱ्या अशुद्ध तेलात तळल्या जात होत्या, तसेच पुरीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांची मुदतही संपलेली होती. तसेच येथे प्रचंड अस्वच्छता होती, तसेच बनवलेल्या पुऱ्यावर माशांचा किलबिलाट सुरू होता .ज्यामुळे या ठिकाणी बनवण्यात येणाऱ्या पुऱ्या आरोग्यासाठी निश्चितच घातक ठरत असल्याचे निदर्शनास आले. बोईसर संजय नगर परिसरातील हा प्रकार पाहिल्यानंतर पोलीस आणि अन्न व भेसळ प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देतील अशी अपेक्षा आहे.
बोईसर शहरातील दांडीपाडा,संजय नगर मध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्यांचे प्रमाण असून याठिकाणी परप्रांतीय देखील राहतात. येथील एका ठिकाणी अतिक्रमण केलेल्या झोपडीत हा किळसवाणा प्रकार सुरु होता. एका पत्र्याच्या शेडमध्ये हे कामगार काम करत आहेत. अस्वच्छ असणाऱ्या या जागेत सुरु असलेला हा प्रकार पाहून यापुढे पाणीपुरी खाताना अनेकजण नक्की विचार करतील. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,संजय नगर,दांडीपाडा,बोईसर शहरात येथे हा गोरख धंदा चालतो. अनेक ठिकाणी असे प्रकार सुरु असल्याची शक्यता आहे. या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय आहेत. मशीनने पुरीचे पीठ मळायचे असल्यास त्यासाठी तब्बल १३ लाख रुपये मोजावे लागतात, त्यामुळे अनेक परप्रांतीय कामगार पायाने आणि अस्वच्छ ठिकाणी पुरीचे पीठ मळण्याचा पर्याय अवलंबतात तर आरोग्यासाठी अपायकारक असलेल्या या पुऱ्या बोईसर चित्रालय परिसरात विक्रीसाठी सहज उपलब्ध करून दिली जात आहे.
हे सर्व प्रकार जय अंबे पाणीपुरी सेंटर ह्या दुकानाचा मालक करत असून त्याच्यावर जनतेचे आरोग्यशी खेळत असल्यामूळे कसून चौकशी करत त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी जनतेकडून मागणी होताना दिसत आहे.
Post Views: 85