जि.प. प्राथमिक शाळा सरेवाडी (नायफड) पर्यावरण क्षेत्रात स्थित आहे. शंभर टक्के आदिवासी व भीमाशंकरच्या पायथ्याशी वसलेली शाळा आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन उत्साहात साजरा केला. पर्यावरणाचे व रक्षाबंधनाचे महत्त्व सांगून पर्यावरणाने भविष्यात मानवी जीवन जगण्यात आनंद निर्माण होणार आहे.भविष्यातील भावी नागरिक म्हणून बालचंमू जागतिक तापमान वाढीच्या परिणांमांना तोंड देणार आहे.हे आटोक्यात आणण्यासाठी वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. वृक्ष हेच आपले बांधव आहे हे रुजविण्याचे काम यावर उपक्रमातून साध्य करायचे आहे. सर्व विद्यार्थ्यांनी राखी बांधून "वृक्षांना द्या मानपान, पर्यावरणाचा राखा मान"असा संदेश दिला "काम करा लाख मोलाचे,निसर्ग आणि त्यांच्या संवर्धनाचे" असा जयघोष करत रक्षाबंधन साजरा करण्यात आला. ही माहिती शाळेचे शिक्षक श्री. विजयकुमार शेटे यांनी विद्यार्थ्यांना दिली.कार्यक्रमास उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक श्री.बापूराव दराडे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.दत्तात्रय शंकर ठोकळ, अंगणवाडी ताई सौ.सुलाबाई ठोकळ, शालेय पोषण आहार स्वयंपाकीताई सौ हिराबाई ठोकळ, सौ. रेश्मा विनायक ठोकळ व नायफड गावच्या ग्रामसेविका सौ.अलका कोकणे - रहाणे उपस्थित होत्या. केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.भरतजी लोखंडे व खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी श्री.जीवनजी कोकणे व समस्त ग्रामस्थ यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
Post Views: 264