स्व‌.सदाशिव आनंदा महाडिक यांच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम


जेष्ठ समाजसेवक ह.भ.प.डॉ.रविन्द्र भोळे यांचा सत्कार
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  20 Mar 2022, 8:08 PM
   

हवेली,जि.पूणे :  शिंदवणे ता.हवेली  येथे स्व‌.सदाशिव आनंदा महाडिक यांच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित  करण्यात आला होता. या वेळी जेष्ठ समाजसेवक ह.भ.प.डॉ.रविन्द्र भोळे यांचा सत्कार करण्यात आला‌. याप्रसंगी डॉ.भोळे यांच्या विविध क्षेत्रातील तसेच विशेषत: अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी परिसरातील जेष्ठ नेते मारुती पाटील यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मत व्यक्त करताना ह. भ. प. डॉ रविंद्र भोळे यांनी प्रतिपादन केले की प्रत्येक जिवात्मा जन्माला आल्यापासून देवऋण,ऋषिऋण,पितृ ऋण,ब्राह्मऋन अश्या  अनेक  ऋणांनी युक्त असतो. याशिवाय समाजऋणही घेऊन मनुष्य जन्माला येतो.ही सर्व ऋण फेडायची असतात.त्यातील पितृऋण हे अध्यात्मिक, धार्मिक  कार्यक्रम व अन्नदानाने  जिवात्म्याला शान्ती मिळून या ऋणातून मुक्तता मिळते.मातृपितृ यांच्या स्मरणार्थ पुण्यस्मरण कार्यक्रम घेणे हा अलौकिक आनंद असतो.असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. डॉ रविंद्र भोळे यांच्या सत्कारप्रसंगी मारुती पाटील,संदीप महाडीक ,राहुल महाडीक ,टी के महाडीक उपस्थित होते .

    Post Views:  324


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व