ग्रामीण पत्रकार संघटना संस्थापक शिरसाट यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमात गजानन हरणे यांचा सन्मानित
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
22 Jan 2024, 1:58 PM
अकोला - महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पि. एल. शिरसाट यांना त्यांच्या पुण्यस्मरणदिनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने अकोल्यातील केंद्रीय कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्याध्यक्षा चंदाताई सीरसाठ ह्या होत्या, तर प्रमुख उपस्थितीमध्ये राज्य उपाध्यक्ष पि.एन.बोळे. राज्य सचिव संजय वानखडे , राज्य कोषाध्यक्ष गजानन हरणे , मुर्तिजापूर तालुकाध्यक्ष अतुल नवघरे , तालुका उपाध्यक्ष पंकज सातपुते , अनिल भेंडकर,प्राची सिरसाठ आदी उपस्थित होते सर्वप्रथम पी.एल. शिरसाट यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आदरांजली देण्यात आली..या प्रसंगी खडकातील जिल्हा परिषद नगरमधील अकोल्याचे ज्येष्ठ समाजसेवक तथा ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य कोषाध्यक्ष गजानन हरणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार व मराठा भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना पुढील सामाजिक राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्यात.यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 69