नवाब मलिकांनंतर त्यांची कन्याही मैदानात, समीर वानखेडेंना अडचणीत आणणारी आणखी कागदपत्रे आणली समोर


 Sanjay M. Deshmukh  2021-11-21
   

मुंबई - गेल्या महिन्यात उघडकीस आलेल्या मुंबईतील आलिशान क्रूझ पार्टीनंतर चर्चेत आलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. क्रूझवरील ड्रग्स पार्टी आणि आर्यन खानला केलेल्या अटकेवरून नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर घणाघाती आरोप करत समीर वानखेडे यांना जेरीस आणले होते. त्याशिवाय समीर वानखेडेंच्या भूतकाळावरूनही नवाब मलिक यांनी त्यांची जात आणि धर्मावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर आता नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक-खान हिनेही समीर वानखेडे यांना अडचणीत आणणारे पुरावे समोर आणले आहेत.

निलोफर मलिक-खान हिने आता समीर वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाची निमंत्रण पत्रिका शेअर केली आहे. त्या ती म्हणते की, समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंब सर्व पुरावे नाकारत आगेत. त्यामुळे आम्ही सर्वांसमोर अजून एक पुरावा समोर आणत आहोत. ही आहे समीर दाऊद वानखेडे यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका. ज्या माणसाने केवळ गृहितकांच्या आधारावर अटकेची मागणी केली आहे. तीच व्यक्ती हे सबळ पुरावे नाकारत आहे.

तसेच सना मलिक यांनीही आणखी एक ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी समीर वानखेडेंच्या पहिल्या विवाहाचे सर्टिफिकेट सोशल मीडियावर शेअर केले आहे. समीर वानखेडे यांच्या मूळ धर्माची नोंद असलेली कागदपत्रे काल समोर आली होती. त्यात आर्यन खान प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टाने समीर वानखेडेंना धक्का देणारे निरीक्षण नोंदवले आहे. त्यानंतर आता मलिक यांच्या कन्येने समोर आणलेल्या कागदपत्रांमुळे समीर वानखेडे यांच्या अडचणी अधिकच वाढणार आहेत.  

    Post Views:  264


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व