पुणे : गुरुवार दि. २१एप्रिल रोजी शाळा पूर्व तयारी कार्यक्रमांतर्गत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना ढोल ताशा व लेझीम पथकाच्या साहाय्याने मिरवणुकीद्वारे विद्यार्थ्यांचे शाळेत आगमन करण्यात आले.
महाराष्ट्र शासन,एम.सी. आर.टी पुणे,खेड पंचायत समिती व पुणे जिल्हा परिषद यांच्यावतीने झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.दत्तात्रय ठोकळ, श्री.निलेश ठोकळ,सौ. सुलाबाई ठोकळ (अंगणवाडीताई), सौ.कुसुमताई ठोकळ (एकलव्य शिक्षिका), श्री.सचिनशेठ ठोकळ,सौ.सुंदराबाई ठोकळ व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
नवीन विद्यार्थ्यांना शालेय आनंद मिळावा म्हणून सेल्फी पॉइंटचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना सेल्फी काढण्यात आनंद वाटला. प्राथमिक स्वरूपाची माहिती विद्यार्थ्यांकडून तपासून त्यांच्या शैक्षणिक अंगाच्या विकासाची पुस्तिका पालकांना स्वाधीन करण्यात आली. विद्यार्थ्यांना शालेय वातावरण खुशी खुूूशीचे असावे. म्हणून शाळा पूर्व तयारी करून घेण्यात आली कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना केळी व अल्पोपहार देण्यात आला.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक खेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री.जीवनजी कोकणे, नायफड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.भरत लोखंडे, व्यवस्थापक मुख्याध्यापक श्री.बापूराव दराडे व सूत्रसंचालन श्री.विजयकुमार शेटे यांनी केले.
Post Views: 180