ऑल इंडिया अँटीकरप्शन पार्लमेंट कमिटीच्या अकोला जिल्हा अध्यक्षपदी डॉ. संजय चव्हाण
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
09 Dec 2022, 8:11 PM
अकोला ः अकोला जिल्हा ऑल इंडिया आँटी करशन पार्लमेंट कमिटी अकोला जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर संजय भोपतराव चव्हाण निवड करण्यात आली आहे डॉक्टर संजय चव्हाण मु. पो. जनुना तालुका बार्शिटाकळी जिल्हा अकोला येथील रहिवासी असून ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांच्या सामाजिक त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन संघटनेने त्यांची अकोला जिल्हा अध्यक्षपदी निवड केली आहे.
त्यांना नुकतीच निवडीचे पत्र दिले आहे. शासकीय कार्यालयात होणार्या भ्रष्टाचाराला आळा बसण्यासाठी येथून पुढे ते काम करणार आहेत. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चेतना सकुंडे व राज्यसचिव पंकज धायघुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भ्रष्टाचार निर्मुलनाचे काम करणार असल्याचे डॉ. संजय चव्हाण यांनी सांगितले.
संजय चव्हाण अकोला जिल्ह्याच्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या जिल्हाअध्यक्ष, न्यूज 1 इंडिया अकोला रिपोर्टर दै. सुपरभारत अकोला जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. त्यांना अकोला, वाशिम जिल्ह्यात उल्लेखनीय कार्याचा सामाजिक क्षेत्रातील चांगला अनुभव आहे.
Post Views: 166