ग्राहक जागर चे यवतमाळात थाटात प्रकाशन


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  17 Mar 2023, 9:30 AM
   

यवतमाळ : संघटनेचे विचार आणि कार्याचा विस्तार  करण्यात प्रसार माध्यम म्हणून ग्राहक जागर हे त्रैमासिक प्रकाशित करून  ग्राहक पंचायतने फार चांगले काम केले आहे. समाजातील विविध  घटकांनी या ग्राहक प्रबोधनाच्या कार्यात  आपापल्या परीने सहभागी झाले पाहिजे असे सांगून संघटनेच्या कार्य विस्तारात ग्राहक-जागर हे प्रसाराचे 
माध्यम महत्त्वाची भूमिका पार पाडेल असा विश्वास यवतमाळचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री ललित कुमार वर्‍हाडे यांनी व्यक्त केला. 
अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांताच्या वतीने 15 मार्च या जागतिक ग्राहक दिनाच्या मुहूर्तावर ग्राहक-जागर या त्रैमासिकाचे प्रकाशन ग्राहक दिनाच्या संध्याकाळी येथे एका विशेष कार्यक्रमात  श्री वर्‍हाडे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा ग्राहक न्याय आयोगाचे अध्यक्ष न्या. नंदकुमार वाघमारे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार,अन्न व औषध प्रशासनाचे  श्री गोपाल माहुरे,ग्राहक पंचायतीचे विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ.नारायण मेहरे यावेळी मंचावर उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नंदकुमार वाघमारे यांनी ग्राहक पंचायत च्या या उपक्रमाला शुभेच्छा देऊन या माध्यमाचा उपयोग ग्राहक प्रबोधना साठी करण्यात यावा असे आवाहन केले. या माध्यमातून ग्राहक आयोगाने दिलेल्या  महत्त्वपूर्ण  निकालांचे प्रकाशन करण्यात आले तर त्याचा उपयोग ग्राहक हितासाठी करता येईल असेही मत त्यांनी व्यक्त केले.  विविध प्रशासकीय विभागांनी ग्राहक हिताच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती देऊन आपले  योगदान देण्याचे आवाहन डॉ नारायण मेहरे यांनी यावेळी बोलताना केले. 
जिल्हा पुरवठा अधिकारी श्री सुधाकर पवार तसेच अन्न व औषध प्रशासन अधिकारी श्री गोपाल माहुरे यांनीही यावेळी ग्राहक जागर च्या उपक्रमास आपल्या भाषणातून शुभेच्छा देऊन सर्व प्रकारच्या सहकार्याचे आश्वासन दिले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद, ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.कोषाध्यक्ष अनंत भिसे, जिल्हा संघटक हितेश सेठ, शहर सचिव शेखर बंड,वीरेंद्र चौबे, जिनेंद्र बंगाले यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन शहर अध्यक्ष अँड राजेश  पोहरे यांनी केले तर जिल्हा सचिव डॉ केशव चेटूले यांनी आभार मानले. येथील तूलिप सभागृहात पार पडलेल्या या समारंभात न्याय आयोगाचे सदस्य   ऐड. हेमराज ठाकूर, वैध मापन विभागाचे गजानन पोहनकर,वजनमापे उपनिबंधक के. एल.रीठे,रा.स्व. संघाचे विभाग कार्यवाह अंकुश रामगडे,डॉ. दिलीप देशमुख, डॉ.प्रशांत कसारे, डॉ.दीपक शिरभाते,डॉ. दत्तात्रय डुबेवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ग्राहक पंचायत च्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले ग्राहक- जागर हे त्रैमासिक   मुद्रित व डिजिटल असे दोन्ही स्वरुपात वाचकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे .

    Post Views:  304


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व