सूर्योदय बालगृहातील मुलांसाठी निस्वार्थ रुग्ण सेवा परिवाराच उद्घाटनाच्या निमित्य भव्य रक्तदान शिबिर
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
03 Jul 2023, 11:38 AM
आज निस्वार्थ रुग्ण सेवा परिवाराच्या भव्य उद्घाटन सोहळा सूर्योदय बालगृहामध्ये मोठ्या संख्येने पार पडला. निस्वार्थ रुग्ण सेवा परिवारातील युवकांनी 18 रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान दिले. हा परिवार गेल्या 3 वर्षापासून निस्वार्थ रूग्णसेवा परिवार वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून काम करत आहे आतापर्यंत 1600 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. निस्वार्थ रूग्णसेवा परिवार हे नाव सुचल्यानंतर 3 महिन्यातच 159 रक्तदात्यांनी रक्तदान केले या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या यशस्वीकरिता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल भटकर यांनी केले या कार्यक्रमात ला उपस्थिती असलेले प्रा.डॉ.संकेत काळे ,प्रा.डॉ.कविता कावरे,प्रा.डॉ.रोहित काळे,निखील भैया ठाकूर, सचिन फुटे ,डॉ.सचिन सदाफडे, माझी डी.वाय.एस.पी गजानन इंगळे, अकोला ब्लड बँक चे संचालक स्वामी सर, नटेश्वर नाट्य थेटर कला ग्रुपचे संचालक सचिन पाटील सर ,सूर्योदय बालगृहाचे अधीक्षक शिवराज पाटील सर,प्रा.विजय अग्रवाल , सामाजिक कार्यकर्ते लिना ताई चीन,माया ताई मेंडे,अतुल महल्ले सर, मायाताई डांबरे,उपसरपंच सिसा-मासा शिंदे साहेब,प्रमया संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल पिंगळे सर,अकोला ब्लड बँक ची सर्व टीम व निस्वार्थ रुग्णसेवा परिवार हे सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिवकुमार राऊत यांनी केले.
Post Views: 207